पुणे : Pune Crime | पूर्ववैमनस्यातून एका टोळक्याने तरुणाला मारहाण करुन गोळीबार करुन पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणे गावात दहशत माजवली. याप्रकरणी जेजुरी पोलिसांनी (jejuri police) आदित्य कळमकर, आदित्य चौधरी व त्यांच्या 10 ते 12 साथीदारांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.
सचिन मोहन मेमाणे (वय २९, रा. पारगाव माळवाडी, ता. पुरंदर) यांनी जेजुरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पारगाव मेमाणे (Pargaon Memane) गावाच्या हद्दीत शनिवारी दुपारी फिर्यादी व आरोपी यांच्यात भांडणे झाली होती. या कारणावरुन आरोपींनी रात्री आठ वाजता फिर्यादी याच्या घरात शिरुन सचिन मेमाणे व त्याच्या घरातील लोकांना तलवारी, कोयते, हॉकी स्टीक, लाकडी दांडके अशा हत्यारांनी मारहाण केली.
त्यांना गंभीर दुखापत केली. सचिन मेमाणे हा तेथून पळून जाऊ लागला. तेव्हा आरोपींनी त्याचा पाठलाग सुरु केला. फिर्यादींचा चुलत भाऊ गणेश मेमाणे याला स्वीफ्ट कारमधून आलेल्याने खाली उतरुन पिस्टलमधून गोळीबार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच चौकात जाऊन आरोपींनी त्यांच्याकडील तलवारी हातात नाचवून चौकातील दुकाने बंद करुन लोकांमध्ये दहशत माजवून ते निघून गेले. जेजुरी पोलिसांनी (Jejuri Police) बेकायदा जमाव जमवून दंगल माजविणे, खुनाचा प्रयत्न करणे अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.