Pune Crime | जमीन खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकावर बोपदेव घाटात गोळीबार, शहरातील गोळीबाराची तिसरी घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | जमीन खरेदी-विक्री करणाऱ्या एका व्यावसायिकावर कोंढवा परिसरातील बोपदेव घाटात गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे (Pune Crime) पुणे शहरात खळबळ उडाली आहे. दुचाकीवरुन आलेल्या दोन हल्लेखोरांनी व्यावसायिकावर पिस्तुलातून गोळीबार केला. पुणे शहरात मागील दोन दिवसांमध्ये तीन गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत.

याप्रकरणी आसिफ खान (वय -33, रा. कोंढवा खुर्द) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरु केला आहे. (Pune Crime)

फिर्यादी आसिफ खान यांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास ते आणि त्यांचा मित्र दुचाकीवरुन बोपदेव घाटातून जात होते. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी आसिफ खान यांच्यावर गोळीबार केला. गोळीबार करण्यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, जमीन खरेदी विक्री किंवा पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. गोळीबार करुन फरार झालेल्या आरोपींचा शोध घेतला जात असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे करीत आहेत.

पुणे शहरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
शहरात मागील दोन दिवसांमध्ये गोळीबारीच्या तीन घटना घडल्या आहेत.
गुरुवारी रात्री कोरेगाव पार्क येथे जुन्या भांडणाच्या रागातून तरुणाला भररस्त्यात बेदम मारहाण करुन गोळीबार केला.
तर शुक्रवारी रात्री लोहगाव भागात टोळक्याने दहशत माजवून हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे.

Web Title :- Pune Crime | Firing on businessman selling land in Bopdev Ghat, third incident of firing in the city

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Hindi Language Politics | हिंदी भाषेचे राजकारण पुन्हा पेटले, तामिळनाडूमध्ये एकाचा आत्मदहनामुळे मृत्यू

Pune Crime | पुणे शहरात मेफेड्रोन व गांजा विक्री करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेकडून अटक, 4.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

Baba Ramdev Controversy | ठाण्यातील वक्तव्यानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची रामदेव बाबांना नोटीस