Pune Crime | आधी रुफ टॉप हॉटेल, त्यात बेकायदा हुक्का बार अन् मोठ्या आवाजात साऊंड सिस्टिम लावणार्‍या हॉटेलवर कारवाई

पुणे : Pune Crime | आगीच्या घटना घडल्याने महापालिकेने रुफ टॉप हॉटेलवर बंदी घातली आहे. असे असताना रुफ टॉपवर हॉटेल सुरु ठेवले. त्यात बेकायदेशीरपणे हुक्काबार (Hookah Bar) सुरु केला. इतकेच नाही तर नागरिकांना त्रास होईल, अशा पद्धतीने मोठ्या आवाजात साऊंड सिस्टिम (Sound System) लावून एकाच वेळी अनेक गुन्हे करणार्‍या हॉटेलवर पोलिसांनी (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

कोंढव्यातील सिल्वर स्पुन हॉटेलवर (Silver Spoon Hotel, Kondhwa) कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा व विमाननगर परिसरात हुक्का बार व मोठ्या आवाजात साऊंड सिस्टिम सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाने (Social Security Department) सिल्वर स्पुन हॉटेलवर छापा टाकला. तेथील ४ हजार ८०० रुपयांचे हुक्क्याचे साहित्य जप्त केले. तसेच तेथील २ लाख ८५ हजार रुपयांचे साऊंड सिस्टिम जप्त करण्यात आले आहे.

विमाननगरमधील मस्क्यिुटर्स या हॉटेलमध्ये (Musketeer’s Hotel) मोठ्या आवाजात साऊंड सिस्टिम
सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार या हॉटेलमधील २ लाख ३४ हजार रुपयांचे साऊंड सिस्टिम जप्त
करण्यात आले आहे. दोन्ही कारवाईमध्ये ५ लाख १९ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
(Pune Crime)

सामाजिक सुरक्षा विभागचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार
(Senior Police Inspector Vijay Kumhar), सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे
(Assistant Police Inspector Aniket Pote), पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे,
मनिषा पुकाळे, आण्णा माने, हणमंत कांबळे, इरफान पठाण, अमित जमदाडे, पुष्णेंद्र चव्हाण या पथकाने केली आहे.

Web Title :-  Pune Crime | First, action was taken against the roof-top hotel, which had an illegal hookah bar and a hotel with a loud sound system.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Actress Sunny Leone | अभिनेत्री सनी लिओनीने ठोठावले केरळ उच्च न्यायालयाचे दरवाजे, जाणून घ्या नेमक काय आहे प्रकरण?