Pune Crime | ‘मम्मी’ला कापून टाकण्याची धमकी देऊन 5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार; लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आपल्या मावशीच्या घरी आलेल्या पाच वर्षाच्या चिमुरडीला धमकावून तिच्यावर नातेवाईकाने लैगिंक अत्याचार (Sexual Assault) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणीकाळभोर पोलिसांनी (Lonikalbhor Police) ऋषीकेश दत्ता गिरी Rishikesh Dutta Giri (वय २५, रा. एम आय टी कॉलेज, लोणी काळभोर, हवेली) याला अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी मुंबईतील एका ३५ वर्षाच्या महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४००/२२) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांचा नातेवाईक आहे.
फिर्यादी यांची ५ वर्षाची मुलगी कुंजीरवाडी (Kunjirwadi, Pune) येथे आली होती.
यावेळी त्याने या मुलीवर अत्याचार केला. या बाबत कोणास काही एक सांगितले
तर तुझ्या मम्मीला कापून टाकु, अशी धमकी (Threat) दिली.
हा प्रकार २४ जुलैपूर्वी घडला होता. या मुलीला त्रास होऊ लागल्यानंतर तिने आईला याची माहिती दिली.
त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली.
पोलिसांनी या नराधमास अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक देशमुख (Sub-Inspector of Police Deshmukh)
अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Five-year-old girl molested by threatening to cut off her mother

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा