Pune Crime | अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई, 5 लाखाचा भेसळयुक्त गुळ व साखर जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration (FDA) दौंड तालुक्यातील दापोडी व केडगाव येथील तीन गुळ उत्पादकावर (Jaggery Producer) कारवाई केली आहे. या कारवाईत (Pune Crime) तब्बल 5 लाख 33 हजार 870 रुपये किंमतीचा भेसळयुक्त गुळ व साखर जप्त केली.

अन्न व औषध प्रशासनातर्फे मुदतबाह्य चॉकलेट (Expired Chocolate), भेसळयुक्त गुळ व साखर वापरणाऱ्या गुळ उत्पादकावर कारवाई करण्यात येत आहे. दापोडी येथील मे. सचिन गुळ उद्योग व मे.सुपर स्टार गुळ उद्योगाचे मालक सचिन मोहिते (Sachin Mohite) या गुळ उत्पादकावर धाडी टाकुन धाडी टाकून भेसळयुक्त गुळ व साखरेचे नमुने घेऊन उर्वरित 51 हजार 30 रुपये किंमतीचा सुमारे 1 हजार 458 किलो गुळ व 51 हजार रुपये किंमतीची 1 हजार 500 किलो साखरेचा साठा जप्त करण्यात आला होता.(Pune Crime)

केडगाव येथील मे. समर्थ गुळ उद्योगाचे मालक अमोल गव्हाणे (Amol Gavane) या गुळ उत्पादकावर धाडी टाकुन भेसळयुक्त गुळ व साखरेचा एक नमुना घेऊन उर्वरित 3 लाख 72 हजार 640 रुपये किंमतीचा सुमारे 10 हजार 960 किलो गुळ व 59 हजार 200 रुपये किंमतीची 1 हजार 850 किलो साखर जप्त करण्यात आली आहे.

याबाबत प्रशासनास मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत असल्याने प्रशासनामार्फत लवकरच विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.
याप्रकरणी गैरप्रकार आढळून येणाऱ्या गुऱ्हाळ घरावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
सणासुदीच्या काळात ग्राहकांची फसवणूक करुन कमी दर्जाचे अन्न पदार्थ विक्री करणाऱ्याविरुद्ध १८०० २२२ ३६५ या
टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी.
जिल्ह्यातील सर्व गुऱ्हाळ चालकांनी अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ या कायद्याअंतर्गत आवश्यक असलेला
परवाना प्राप्त करुनच गुळ उत्पादन करण्याचे आवाहन
अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सहायक आयुक्त संजय नारागुडे
(FDA Pune Assistant Commissioner Sanjay Naragude) यांनी केले आहे.

Web Title :-  Pune Crime | Food and Drug Administration action against jaggery producer in Daund taluka

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | प्रेमात झाला धोका, ट्रेनवर चढून ओव्हरहेड वायर धरली; पुणे स्टेशनमधील धक्कादायक प्रकार

Amol Kolhe | राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे गृहमंत्री अमित शहांना भेटले, राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण