Pune Crime | पैशाच्या लोभापायी पैसे गेले अन् जमीनही; २५ लाख फसवणूक प्रकरणी FIR

पिंपरी : Pune Crime | सहा महिन्यात दुप्पट पैसे मिळण्याच्या लोभापायी त्याने उसने पैसे घेऊन २५ लाख रुपये दिले. पण, व्यवहार पूर्ण न झाल्याने शेवटी उसने घेतलेले पैसे परत करण्यासाठी बाजारभावापेक्षा निम्म्या किंमतीत शेतजमीन विकून पैसे परत केले. शेवटी गुंतवलेले पैसे परत न मिळाल्याने २५ लाख रुपयांची फसवणुक (Fraud Case) झाल्याची तक्रार देण्याची वेळ एका व्यावसायिकावर आली. (Pune Crime)

याप्रकरणी रावेत येथे राहणार्‍या एका ५४ वर्षाच्या व्यावसायिकाने निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७१०/२२) दिली आहे. त्यानुसार मनोज नारायण पुंडे Manoj Narayan Punde (वय ५५, रा. शिवाजी पार्क, मुंबई) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2012 ते आतापर्यंत झाला आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा बांधकाम व्यवसाय (Construction Business) आहे. त्यांची आणि आरोपी पुंडे यांची व्यवसायानिमित्त ओळख होती. पुंडे याने एका जमिनीच्या व्यवहारासाठी गळ टाकली व चांगल्या परताव्याची हमी दिली. फिर्यादी यांनी दुसर्‍या व्यक्तीकडून २५ लाख रुपये घेतले. ती रक्कम पुंडे याला दिली. सहा महिन्यात ५० लाख रुपये देण्याचे त्याने कबुल केले होते. तसा करारही केला. त्यासाठी त्यांच्या सदनिकेची मुळ कागदपत्रे फिर्यादीकडे दिले होते.

काही कारणामुळे व्यवहार पूर्ण न झाल्याने पुंडे याने पैसे परत केले नाही. ज्या व्यक्तीकडून पैसे घेतले होते.
त्यांना ते परत करण्यासाठी मावळ तालुक्यातील शिरगाव येथील शेतजमीन विकावी व हा व्यवहार मिटवावा,
असे पुंडे याने सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी बाजारभावाच्या निम्म्या किंमतीत शेत जमीन विकून दुसर्‍या व्यक्तीकडून घेतलेले पैसे परत केले.
फिर्यादी यांच्याकडे सदनिकेची कागदपत्रे दिली होती.
ती सदनिका पुंडे याने विक्रीस काढली.
याबाबत पोलिसांकडे तक्रार केल्यावर त्याने ही सदनिका विकून लवकरात लवकर पैसे परत करतो, असे सांगितले.
त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही.
त्यानंतर फिर्यादी यांनी न्यायालयात धाव घेतली.
न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

Web Title :- Pune Crime | For the greed of money, money is lost and so is land; FIR in 25 lakh fraud case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा