Pune Crime | पार्टीसाठी टोळक्याने कोयताचा धाक दाखवून लुटले; सिंहगड रोड पोलिसांकडून 6 सराईत गुन्हेगारांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पार्टीसाठी पैसे हवे असल्याने एका गुंडांच्या टोळक्याने तरुणाच्या गळ्याला कोयता लावून त्यांच्या खिशातील पैसे जबरदस्तीने काढून घेऊन लुबाडले. सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police Station) या टोळक्यावर दरोड्याचा (
Robbery in Pune) गुन्हा दाखल करुन ६ जणांना अटक (Pune Crime) केली आहे.

विशाल राजू लोंढे (वय २४, रा. आंबेडकरनगर, धायरी), साई ऊर्फ संतोष आगंद आखाडे (वय १९), आकाश बाबुराव शिंदे (वय २१, रा. नर्‍हे), आदित्य संतोष घोरपडे (वय १९), ओंकार तानाजी तुपे (वय २१, रा. धायरी) आणि आदया ऊर्फ आकाश विलास जानराव (वय २३, रा. धायरी) अशी अटक केलेल्यांची (Pune Criminals) नावे आहेत.

याप्रकरणी प्रविण सिद्राम थोरे (वय ३६, रा. चरवड वस्ती, वडगाव बुद्रुक) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
थोरे हे त्यांच्या मित्रांसोबत चरवड वस्ती येथील पी एम सी पाण्याचे टाकीजवळ २३ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता मित्रांसोबत गप्पा मारत बसले उभे होते. त्यावेळी पाच दुचाकीवरुन आरोपी तेथे आले. त्यांनी फिर्यादी यांना पकडून त्यांच्या गळ्याला कोयता लावला. पँटच्या खिशातील १६०० रुपये व आधार कार्ड जबरदस्तीने काढून घेतले. ‘‘आपल्याला पार्टीला पैसे भेटले रे’’ असे मोठ्याने ओरडत त्यांच्या गाडीचे १५ हजार रुपयांचे नुकसान केले. (Pune Crime)

हा प्रकार सुरु असताना जाणारे येणारे थांबून पाहून लागले. तेव्हा त्यांनी लोकांना ‘‘काय बघताय रे हरामखोरांनो तुम्हालाही मारुन टाकू’’ अशी धमकी देऊन दहशत निर्माण करुन निघून गेले. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी या टोळक्याचा शोध घेऊन अप्पर पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale), उपायुक्त पोर्णिमा गायकवाड (DCP Purnima Gaikwad), सहाय्यक आयुक्त सुनिल पवार (ACP Sunil Pawar), वरिष्ठ निरीक्षक युसुफ शेख (Senior Police Inspector Yusuf Shaikh), पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे (Police Inspector Pramod Waghmare) यांच्या मार्गदर्शनाखाली सिंहगड रोड पोलिसांनी आरोपींना अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले (API Chetan Thorbole) तपास करीत आहेत.

Web Title  : Pune Crime | For the party, the pune criminals looted youth; Sinhagad Road Police arrested 6 criminals in robbery case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा