Pune Crime | बळजबरीने शारीरीक संबंध ठेवून दिला लग्नास नकार, कोथरुडमधील कुटुंबावर अनुसुचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा

पुणे : Pune Crime | तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याबरोबर वारंवार बळजबरीने शारीरीक संबंध ठेवले़ त्यातून ती गर्भवती राहिल्यावर खालच्या जातीची असल्याचे सांगून लग्नास नकार देणार्‍या कोथरुडमधील एका कुटुंबावर पोलिसांनी बलात्कारासह अनुसुचीत जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

श्रेयस दत्तप्रसाद जोशी (Shreyas Dattaprasad Joshi) , भाग्यश्री दत्तप्रसाद जोशी (Bhagyashree Dattaprasad Joshi) आणि दत्तप्रसाद जोशी Dattaprasad Joshi(रा. डावी भुसारी कॉलनी, कोथरुड) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका २५ वर्षाच्या तरुणीने कोथरुड पोलिसांकडे (Kothrud Police) फिर्याद दिली आहे. ही घटना १९ जून २०१९ ते ५ ऑगस्ट २०२१ दरम्यान घडली.

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात लिव्ह अ‍ॅन्ड लायसन्स कराराने हॉटेल भाडयाने घेऊन चालविलं जात होतं सेक्स रॅकेट, लोहगाव परिसरातून तिघांना अटक

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रेयस जोशी याने फिर्यादी या अनुसुचीत जातीच्या आहेत, हे
माहिती असताना सुद्धा त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याबरोबर वारंवार बळजबरीने शरीर संबंध केले. फिर्यादी यांनी त्यांचे प्रेमसंबंध श्रेयस याच्या आई वडिलांना सांगितल्यावर त्यांनी शिवीगाळ करुन तू खालच्या जातीची आहे. आम्ही तुझा स्वीकार करणार नाही, असे सांगितले. या शरीरसंबंधातून फिर्यादी गर्भवती राहिल्या. तेव्हा श्रेयस याने लग्न करण्याचे टाळून फिर्यादी यांच्या आईला औरंगाबाद येथे बोलावून शिवीगाळ केली व जीव मारण्याची धमकी दिली आहे. कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

Gold Price Today | सोन्याच्या किंमतीत पुन्हा तेजी, सोनं ’47’ हजार पार; जाणून घ्या

Ministry of Defence Recruitment 2021 | सरकारी नोकरीची संधी, 10 वी उत्तीर्ण करू शकतात अर्ज; 400 पदांसाठी भरती, जाणून घ्या

Relationship | धोकेबाज प्रियकरानं SORRY बोलून मागितला दुसरा ‘चान्स’, आता 1 वेळा ‘चॅट’ करण्याच्या बदल्यात 20 हजार घेते प्रेयसी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | Forced physical relation, refusal to marry, crime under the Prevention of Scheduled Caste and Scheduled Tribe Atrocities Act against a family in Kothrud

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update