Pune Crime | थकीत वीजबिल वसुलीसाठी आलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्याला मारहाण, भाजपच्या माजी नगरसेवकावर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – थकीत वीजबिलाची (Overdue Electricity Bill) वसुली करण्यासाठी आलेल्या महावितरण कंपनीच्या (MSEDCL) अधिकाऱ्याला भाजपच्या माजी नगरसेवकाने (Former BJP Corporator) लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण (Beating) केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात (Pune Crime) घडला आहे. वीजबिल थकल्याने वीज कनेक्शन कट करण्यासाठी आल्याच्या रागातून माजी नगरसेवकांनी अधिकाऱ्याला मारहाण केली. ही घटना पुण्यातील (Pune Crime) आंबील ओढा (Ambil Odha) परिसरातील पीएमसी कॉलनीत गुरुवारी (दि.13) सकाळी 11 च्या सुमारास घडली.

 

याप्रकरणी महावितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ सफल शांताराम (Safal Shantaram) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार दत्तवाडी पोलिसांनी भाजपचे माजी नगरसेवक धनंजय जाधव (Former Corporator Dhananjay Jadhav) यांच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे नवी पेठेतील महावितरण कार्यालयात (Navi Peth MSEDCL Office) कार्यरत आहेत.
गुरुवारी सकाळी ते आपल्या काही सहकाऱ्यांसह आंबिल ओढा परिसरातील सानेगुरुजी वसाहत (Sane Guruji Colony) येथे थकीत वीजबिल वसुलीसाठी गेले होते.
वीजबिल थकल्याने फिर्यादी वीज कनेक्शन कट करत असताना माजी नगरसेवक धनंजय जाधव हे त्या ठिकाणी आले.

 

धनंजय जाधव यांनी मी लाईट बिल भरले आहे, तू मला ओळखत नाही का, मी माजी नगरसेवक आहे, तू आमच्या दारात का आला, कोणाचे घर आहे हे बघून येता येत नाही का, असे बोलून फिर्यादी यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी यांच्या शर्टचे बटण तोडून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कस्पटे (PSI Caspate) करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Former bjp corporator Dhananjay Jadhav beats msedcl official who came collect overdue electricity bill dattawadi police station

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा