Pune Crime | लष्कर कॅन्टोंमेंटचा माजी नगरसेवक विवेक यादवनं नामचीन गुन्हेगाराच्या हत्येची सुपारी दिल्याचं उघड, 2 सुपारी किलर अटकेत; मोठा शस्त्रसाठा जप्त, जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime |पुणे पोलिसांनी कुविख्यात गुन्हेगाराच्या खुनाचा कट उधळत मोठा शस्त्र साठा जप्त (Pune Crime)केला आहे. लष्कर कॅन्टोंमेंट बोर्डाचा भाजपचा माजी नगरसेवक विवेक महादेव यादव (Former BJP corporator of Lashkar Cantonment Board Vivek Mahadev Yadav) याने या खुनाची सुपारी दोन किलरला दिली होती. पण, त्यापूर्वीच पोलिसांनी या दोघांना पकडले आहे. त्यांच्यावर गुन्हा (Pune Crime( दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी राजन जॉन राजमनी Rajan John Rajamani (वय 38, रा. भाग्योदयनगर, कोंढवा) व इब्राहिम उर्फ हुसेन याकुब शेख Ibrahim alias Hussein Yakub Shaikh (वय 27, रा.वाकड) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात (kondhwa police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर विवेक यादव व त्याचा एक साथीदार पसार असून, त्यांच्या शोधासाठी तीन पथके रवाना झाली आहेत.

विवेक यादव (Former BJP corporator of Lashkar Cantonment Board Vivek Mahadev Yadav) हा भाजपाचा लष्कर कॅन्टोमेंट बोर्डाचा माजी नगरसेवक आहे. दरम्यान 2016 मध्ये यादव यांच्यावर गणेशोत्सव काळात रात्री गोळीबार झाला होता. हा गोळीबार सराईत गुन्हेगार बबलू गवळी (Bablu Gavli) याने केला होता. या दोघांमध्ये पूर्ववैमनस्य आहे. त्यातून हा गोळीबार झाला होता. पुर्वी केलेल्या गोळीबाराच्या कारणावरून आणि पुर्ववैमनस्यातून विवेक यादवने दोघा आरोपींना बबलू गवळी याच्या खुनाची सुपारी दिली होती. त्याला कुठे व कशा पद्धतीने ठार मारायचे हे देखील ठरले होते. त्याबाबत कॉल आणि चॅटिंगद्वारे या दोघांचे बोलणे झाले होते.

दरम्यान बबलू गवळी (Bablu Gavli) हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या कारागृहातून बाहेर आला आहे. त्याला या काळात ठार मारायचे होते.
दरम्यान यानुसार हा कट सुरू असतानाच याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या दोघांना त्यापूर्वीच पकडले.
त्यांच्याकडून 3 पिस्तुल आणि 7 काडतुसे असा साठा जप्त केला आहे.

दरम्यान या दोघा किलरला विवेक यादव यानेच त्याच्या साथीदारांकडून पिस्तुल मिळवून दिल्याचे समोर आले आहे.
दरम्यान सध्या विवेक यादव आणि त्याचा साथीदार पसार आहे.
या दोघांचा शोध गेल्या काही दिवसांपासून पोलीस घेत आहेत. मात्र अद्यापही त्यांचा काही पत्ता लागलेला नाही.
अधिक तपास कोंढवा पोलीस (Kondhwa Police) करत आहेत.

Web Title :  Pune Crime | Former BJP corporator of Lashkar Cantonment Board Vivek Mahadev Yadav give online-supari to kill criminal bablu gavli

Pune Crime | धक्कदायक ! पुणे जिल्ह्यात 5 लाखांचे मासे चोरीला; शेतकऱ्याची पोलीस ठाण्यात धाव

Scholarship Online Application | विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन !

Theur News | थेऊरचे प्रयोगशील शेतकरी विजय कुंजीर यांना आदर्श कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार

Pandharpur Wari 2021 : संत ज्ञानेश्वर,
संत तुकाराम महाराजांच्या पालख्या शिवशाही बसने पंढरपूरकडे मार्गस्थ