क्राईम स्टोरीपुणे

Pune Crime | मुलीच्या प्रकरणातून तरुणाचा सपासप वार करुन खून, महिलेसह चारजणांना वारजे माळवाडी पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | नात्यातील मुलीसोबत असलेले मैत्रीचे संबंध (Friendship With Girl) न तोडल्याने एका तरुणावर (Youth) धारदार शस्त्राने सपासप वार करुन खून (Murder In Pune) केल्याची घटना पुण्यातील (Pune Crime) वारजे परिसरात दोन दिवसांपूर्वी घडली होती. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) महिलेसह चारजणांवर खुनाचा गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली आहे.

 

प्रद्युन्य प्रकाश कांबळे Pradyunya Prakash Kamble (वय – 22 रा. रामोशीवाडी, सेनापती बापट रस्ता Senapati Bapat Road) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अजय विजय पायगुडे Ajay Vijay Paygude (वय – 19) विजय किसन पायगुडे Vijay Kisan Payagude (वय – 50) एक महिला (सर्व रा. साई श्रद्धा रेसीडन्सी, दांगट पाटील नगर, शिवणे – Shivne), सागर गोविंद राठोड Sagar Govind Rathod (वय – 21 रा. लक्ष्मीनगर, डहाणूकर कॉलनी – Dahanukar Colony, कोथरुड – Kothrud) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत एका अल्पवयीन मुलाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत काबळे हा फिर्यादीचा आतेभाऊ होता. त्याचे आरोपी पायगुडे याच्या नात्यातील एका मुलीसोबत मैत्रीचे संबंध होते. मैत्रीसंबंध तोडून टाकण्यासाठी पायगुडे कांबळे याच्यावर दबाव टाकत होते. तिला त्रास देऊ नको, असे आरोपींनी त्याला सांगितले. दोन दिवसांपूर्वी रात्री मयत कांबळे हा शिवणे परिसरात गेला होता. त्यावेळी आरोपींनी त्याच्यावर धारदार शस्त्राने (Sharp Weapon) वार केले. सिमेंटचा गट्टू आणि लोखंडी गजाने बेदम मारहाण (Beating) केली. यामध्ये गंभीर जखमी होऊन कांबळे याचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर. एन. पार्वे (PSI R.N. Parve) करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | four arrested for killing a youth in warje malwadi police station area

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Back to top button