Pune Crime | पुण्याच्या विश्रांतवाडीत 2 किलो सोन्याचे दागिने चोरणाऱ्या 4 जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील धानोरी (Dhanori) येथील सोनाराच्या घरातून चोरी करुन फरार झालेल्या कामगारासह चार जणांना विश्रांतवाडी पोलिसांनी (Vishrantwadi police) अटक (Arrest) केली आहे. चोरट्यांनी सोनाराच्या दुकानातून 85 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी (Gold Jewelry Theft) केली होती. पोलिसांनी चोरी केलेल्या दागिन्यांपैकी सुमारे 56 लाख रुपये किमतीचे 1 किलो 406 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त (Pune Crime) केले आहेत.

 

मुकेश गोमाराम चौधरी (वय-22) रमेश रामलाल चौधरी (वय-27) भगाराम गोमाराम चौधरी (वय-38), जेठाराम कृष्णाजी चौधरी (वय-38 सर्वजण रा. खुडाला-बाली, पाली, राजस्थान Rajasthan) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय चांदखेडे (Senior Police Inspector Ajay Chandkhede) यांनी दिलेल्या माहितीनुसार, धानोरी भैरवनगर येथील सोनाराच्या घरातून 10 जानेवारी रोजी सुमारे 85 लाख रुपये किमतीचे 2 किलो 81 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरी केल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन (Vishrantwadi Police Station) येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.(Pune Crime)

याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांनुसार गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष पथक नेमण्यात आले होते. तपास पथकातील पोलीस अंमलदार दीपक चव्हाण, प्रफुल्ल मोरे, संदीप देवकाते, शेखर खराडे यांनी केलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या (CCTV) तांत्रिक तपासानुसार काही संशयित इसम हे मागील काही दिवसांपासून तक्रारदार यांच्या घराच्या परिसरात रेकी करत असताना दिसून आले.

 

तक्रारदार यांच्या दुकानात काम करणारा मुकेश चौधरी हा सुट्टीसाठी त्याच्या मूळ गावी राजस्थान येथे असल्याची माहिती मिळाली होती. गुन्ह्याचा अधिक तापसात मुकेश याने त्याच्या साथिदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तेरा दिवस तांत्रिक विश्लेषण व मिळालेल्या माहितीनुसार चार जणांसह एका अल्पवयीन आरोपीला राजस्थान येथून अटक केली.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त गुन्हे नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan), पोलीस उपायुक्त रोहिदास पवार (DCP Rohidas Pawar), वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय चांदखेडे, पोलीस निरीक्षक गुन्हे विजयकुमार शिंदे (Police Inspector Vijaykumar Shinde)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लहू सातपुते (PSI Lahu Satpute), पोलीस हवालदार विजय सावंत, दीपक चव्हाण,
यशवंत किरवे, पोलीस अंमलदार संदीप देवकाते, प्रफुल्ल मोरे, शेखर खराडे, योगेश चांदण, शिवाजी गोपनर,
तांत्रिक विश्लेषण विभाग परिमंडळ चारचे पोलीस अंमलदार श्याम शिंदे, विशेष पोलीस अधिकारी राज राठोड यांच्या पथकाने केली.

 

Advt.

Web Title :- Pune Crime | four arrested for stealing 2 kg gold jewelery from vishrantwadi pune police action

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा