×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | 32 वर्षीय महिलेचा विनयभंग करणार्‍या चौघांवर गुन्हा दाखल; पुण्याच्या...

Pune Crime | 32 वर्षीय महिलेचा विनयभंग करणार्‍या चौघांवर गुन्हा दाखल; पुण्याच्या आंबेगाव पठार परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | एकाच सोसायटीत राहणार्‍या दोन कुटुंबामध्ये पाणी वापरावरुन भांडणे झाली. त्यात एका महिलेबरोबर अश्लिल कृत्य करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) चौघांविरुद्ध विनयभंगाचा (molestation case) गुन्हा दाखल केला आहे. आंबेगाव पठार (ambegaon pathar) येथील ओंकारनगरमधील एका सोसायटीत हा प्रकार (Pune Crime) घडला आहे.

याप्रकरणी एका ३२ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि आरोपी हे एकाच ठिकाणी रहातात. आरोपी हे फिर्यादीचे इमारतीच्या तळमजल्यावर राहतात. एका आरोपीने पाण्याच्या वापरावरून १८ डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास फियाृदी त्यांना अश्लील शिवीगाळ करुन अंगावर धावून गेले. फिर्यादी यांना पाठीमागून छातीस पकडून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. इतर तीन आरोपींनी शिवीगाळ करुन हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण (Pune Crime) करुन त्यांचा विनयभंग केला, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक धामणे (API Dhamne) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Four charged with molesting 32-year-old woman; Incidents in the Ambegaon Plateau area of ​​Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut | ‘ED, CBI, NCB ही 3 चिलखतं दूर करा आणि आमच्याशी लढा’; संजय राऊतांचं अमित शहांना प्रत्युत्तर

Omicron Covid Variant | पाय पसरतोय ओमिक्रॉन ! पुण्याच्या जुन्नरमधील 5 वर्षाच्या मुलासह महाराष्ट्रात 6 नवीन केस, देशात आतापर्यंत 151 प्रकरणे

 

Aishwarya Rai | अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला पाठवण्यात आलं होतं ED चे समन्स, ‘या’ प्रकरणी नाव आलं होतं समोर

Must Read
Related News