Pune Crime | पुणे शहरात वाहन चोरी करणारे चारजण गुन्हे शाखेकडून गजाआड, रिक्षासह 6 दुचाकी जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात (Pune Crime) चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पुणे पोलिसांकडून पेट्रोलिंग वाढवण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 5 (Crime Branch Unit 5) ने पेट्रोलिंग दरम्यान चौघांना बेड्या ठोकल्या (Pune Crime) आहेत. त्यांच्याकडून एक रिक्षा आणि 6 दुचाकी जप्त करण्यात आल्या असून 8 गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई हडपसर पोलीस ठाण्याच्या (Hadapsar Police Station) हद्दीमध्ये करण्यात आली.

वैभव बिनवडे Vaibhav Binwade (वय- 19 रा. माळवाडी, हडपसर), किरण गायकवाड Kiran Gaikwad (वय -19 रा केडगाव, करमाळा) यांना अटक केली आहे. तर त्यांच्या दोन विधिसंघर्षित साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे.

गुन्हे शाखा युनिट पाच चे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील (Police Inspector Hemant Patil) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील (Pune Police) वाढत्या चोरीच्या गुन्ह्यातील ((Pune Crime) आरोपींचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस नाईक अकबर शेख (Akbar Sheikh), विनोद शिवले (Vinod Shivale) व दाऊद सय्यद (Dawood Sayyed) यांना माहिती मिळाली की, हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून रिक्षाची चोरी करणारे आरोपी हडपसर परिसरात फिरत आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी रिक्षा चोरीची असल्याचे कबूल करुन 6 दुचाकी आणि मोबाईल चोरल्याची कबुली दिली.
पोलिसांनी त्यांच्याकडून 1 रिक्षा आणि 6 दुचाकी असा एकूण 3 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींनी हडपसर, कोंढवा (Kondhwa Police Station),
वानवडी पोलीस ठाण्याच्या (Wanwadi Police Station) हद्दीत चोरी केल्याचे तपसात निष्पन्न झाले.
आरोपींकडून जबरी चोरीच्या गुन्ह्यासह 8 गुन्हे उघडकीस आले आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Four persons involved in vehicle theft in Pune city were arrested by the pune police crime branch and 6 two-wheelers along with a rickshaw were seized

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | उसने पैसे न दिल्याने कोयत्याने वार करुन केला खुनाचा प्रयत्न; पुण्याच्या ए. डी. कॅम्प चौकातील घटना

Petrol Diesel Price Pune | पेट्रोल डिझेलच्या दरात सलग चौथ्या दिवशी झाली वाढ; जाणून घ्या पुणे शहरातील इंधनाचे दर

Pune News | ‘२० मार्च व्हेंचर्स’ या संस्थेला आर्थिक सहाय्य मिळावे ! खा. गिरीश बापट यांचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांना निवेदन