Pune Crime | पोलीस स्टेशनमध्येच महिला पोलिसाच्या दुचाकीसह पेटवली 4 वाहने; प्रचंड खळबळ

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | फिरस्त्या माथेफिरु तरुणाने ड्युटीवर जात असलेल्या महिला पोलीस (Lady Police) कर्मचाऱ्याची वाट अडवून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने महिला पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करुन त्यांनी पोलीस ठाण्यात पार्क केलेली दुचाकी आणि जप्त केलेल्या वाहनांचे नुकसान केल्याची घटना पुण्यातील (Pune Crime) चिखली पोलीस ठाण्यात (Chikhali Police Station) घडली आहे. पोलिसांनी तरुणाच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार रविवारी (दि.2) रात्री एकच्या सुमारास घडला.

 

 

निखिल दत्तात्रय कंगणे Nikhil Dattatraya Kangane (वय अंदाजे-22 रा. पिंपरी चिंचवड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी रेखा महादेव गायकवाड Rekha Mahadev Gaikwad (वय- 31) यांनी चिखली पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 3) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी निखिल हा फिरस्ता आहे. 31 डिसेंबर रोजी रात्री पावणे आठच्या सुमारास त्याने फिर्यादी महिला पोलीस ठाण्यात ड्युटीवर जात असताना पोलीस ठाण्याच्या परिसरात त्यांची वाट अडवली. फिर्यादी करीत असलेल्या सरकारी कामात आरोपीने अडथळा निर्माण करुन फिर्यादी आणि पोलिसांना शिवीगाळ केली. (Pune Crime)

 

चिखली पोलीस ठाण्याच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या वाहनांना रविवारी (दि.1) रात्री एकच्या सुमारास आरोपीने आग (Four Vehicles Torched) लावली.
यात पोलिसांनी जप्त केलेली एक चारचाकी आणि फिर्यादी यांच्या दुचाकीसह तीन दुचाकींचे नुकसान झाले.
तसेच इतर वाहनांचे कुशन फाडून आरोपीने नुकसान केले.
पार्किंगमधील दोन सीसीटीव्ही कॅमेरे तोडले. पोलीस ठाण्याच्या खिडक्यांवर दगड मारुन आरोपीने काचा फोडल्या.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देशमुख (PSI Deshmukh) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | four vehicles torched along lady police two wheeler chikhali police station of pimpri

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा