Pune Crime | दुर्दैवी ! विजेचा शॉक लागून चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, पुणे जिल्ह्यातील घटना

0
272
Pune Crime | four-year old boy dies due to electric shock incident at chavanmala-in rajgurunagar of pune district
File photo

राजगुरूनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | घराबाहेरील गॅलरीत असलेल्या नादुरुस्त विद्युत लॅम्पला (Electric Lamp) पाय लागल्याने विजेचा शॉक (Electric shock) लागून चार वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू (Death) झाला. शिवम सोमनाथ टाकळकर Shivam Somnath Takalkar (वय-4) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) खेड तालुक्यातील (Khed Taluka) चव्हाणमळा – होलेवाडी येथे गुरुवारी (दि.21) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, चव्हाणमळा येथे गुरुदेव साम्राज्य सोसायटी (Gurudev Samrajya Society) आहे येथेच शिवम राहतो. गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास शिवम घराबाहेर खेळत होता. त्यावेळी खेळता खेळता घराबाहेरील गॅलरीच्या भिंतीला असलेल्या नादुरुस्त विद्युत लॅम्पला शिवमचा पाय लागला त्यामुळे त्याला विजेचा जोराचा झटका बसला. (Pune Crime)

या विजेच्या धक्क्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत सागर सतिश वाबळे (Sagar Satish Wable) यांनी खेड पोलीस ठाण्यात (Khed Police Station) खबर दिली आहे. पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title : Pune Crime | four-year old boy dies due to electric shock incident at chavanmala-in rajgurunagar of pune district

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा