Pune Crime | रेल्वेत नोकरी लावण्याच्या बहाण्यानं 8.5 लाखांची फसवणूक; पुण्यातील महिला टीसी अधिकाऱ्याला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  रेल्वेत टीसी (Railway TC) म्हणून नोकरी लावण्याच्या बहाण्यानं साडेआठ लाख लुबाडल्याची घटना उघडकीस आली (Pune Crime) आहे. याप्रकरणी ३२ वर्षीय सुमित्रा हुले यांनी निगडी पोलिसात (Nigdi Police Station) फिर्याद दिली असून विविध कलमाअंतर्गत महिला टीसी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून संबंधित महिलेला अटक (Pune Crime) केली आहे. संजीवनी पाटणे (वय २५) असं या महिला टीसी अधिकाऱ्याचे नाव आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुमित्रा हुले यांचा ब्युटीपार्लरचा व्यवसाय असल्याने त्यांची संजीवनी यांच्याशी ओळख झाली. हळूहळू दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती. ज्या ज्या वेळी दोघींची भेट व्हायची त्या त्यावेळी नोकरी संदर्भातील गप्पा मारायच्या. एके दिवशी संजीवनी यांनी सुमित्रा यांना आणि त्यांच्या भावाला रेल्वेत टीसी म्हणून नोकरी लावण्याचं आमिष दाखवलं. हुले यांना संजीवनी या स्वतः टीसी अधिकारी असल्याचे त्यांना माहित होते. त्यामुळे त्यांनी रेल्वेत टीसीची नोकरी लावण्यासाठी सुमित्रा यांचे आणि त्यांच्या भावाचे असे एकत्रित साडेआठ लाख रुपये संजीवनी यांना दिले. पैसे घेऊनही दोघांपैकी एकालाही नोकरी न लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे हूले यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ निगडी पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी संजीवनी विरोधात फसवणुकीचा (Cheating Case) गुन्हा (Pune Crime) दाखल केला. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Web Title : Pune Crime | fraud 8 lakh 50 thousands from woman under lure of giving job in railway as tc accused woman tc officer arrested pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | भरधाव BMW ची दुभाजकाला धडक ! दोन्ही पाय अडकलेल्या अल्पवयीन चालकाची अग्निशमन दलाच्या जवानाने केली सुटका

ST Worker Strike | दुर्देवी ! संपाच्या तणावातून ST चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; प्रचंड खळबळ

Ananya Pandey | अनन्या पांडेचं सोशल मीडियावर ‘कमबॅक’, शेअर केला जबरदस्त व्हिडिओ

Maharashtra Primary Schools Reopen | राज्य सरकारकडून पहिलीपासूनच्या शाळा लवकरच सुरू करण्याचे संकेत

Petrol-Diesel Price Cut | राजस्थान सरकारनेही इंधनावरील व्हॅट केला कमी; महाराष्ट्रात इंधनाचे दर कमी कधी होणार?

Pune Crime | पुण्यात 20 लाखांच्या कर्जाचे वसुल केले 1 कोटी; परतफेड केल्यानंतरही बायको-मुलीला धंद्याला लावण्याची धमकी; बेकायदा सावकारी करणार्‍या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

PM Kisan | खुशखबर ! यावेळी शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये 2000 ऐवजी जमा होती 4000 रूपये, इथं यादीत तपासून घ्या तुमचं नाव