
Pune Crime | टोयाटो लेक्सस व मर्सिडीज कारची परस्पर विक्री करुन फसवणूक, ठाण्यातील एकावर FIR
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | विक्रीसाठी महागड्या चारचाकी घेऊन जाऊन त्याची परस्पर विक्री करुन लोखो रुपयांची फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) अनिल लक्ष्मणदास दाखना (Anil Laxmandas Dakhana) याच्याविरुद्ध आयपीसी IPC 420, 465, 467, 468,471 नुसार गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) केला आहे.
याप्रकरणी ज्ञानेश्वर मारुती गायकवाड Dnyaneshwar Maruti Gaikwad (वय-53 रा. वानवडी-Wanwadi, पुणे) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी अनिल दाखना (वय-42 रा. मंदार गिरी वंसत विहार, फेज ठाणे वेस्ट -Thane) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2020 ते एप्रिल 2022 या कालावधीत उंड्री येथील मार्व्हल सांगरिया सोसायटीमध्ये (Marvel Sangria Society Undri) घडला आहे. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रार अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन
त्यांच्याकडील टोयाटो लेक्सस (Toyota Lexus) व मर्सिडीज कार (Mercedes cars)
विकण्यासाठी घेऊन गेला. कार घेऊन जात असताना आरोपीने फिर्यादी यांच्या टीटी फॉर्मवर (TT Form) सह्या घेतल्या.
त्यानंतर आरोपीने परस्पर दोन्ही कारची विक्री केली. कारची विक्री करुन आलेले
पैसे फिर्यादी यांना न देता त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Fraud by selling Toyota Lexus and Mercedes cars, FIR registered against one who live in thane
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Yoga Asanas For Neck Pain Relief | मानदुखी दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात ‘ही’ आसने; जाणून घ्या
- Amruta Fadnavis On Thackeray Government | ‘उध्वस्तने कुठं नेऊन ठेवलाया महाराष्ट्र आमचा?’; अमृता फडणवीसांची ठाकरे सरकारवर जहरी टीका
- Pune Crime | रस्त्यात थुंकल्याने तलवारीने वार, स्वारगेटच्या गुलटेकडी परिसरातील 6 जणांना दहा वर्षे सक्तमजुरी