Pune Crime | गोयल गंगा ग्रुपचे अतुल गोयल व अमित गोयल यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल, बनावट खरेदी खताद्वारे SRA प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न

पुणे :पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक (Top Builder in Pune) गोयल गंगा ग्रुपचे (Goel Ganga Group) अतुल गोयल (Atul Goel) आणि अमित गोयल (Amit Goel) यांच्या विरोधात बिबवेवाडी पोलिस ठाण्यामध्ये (Bibvewadi Police Station) फसवणुकीचा (Cheating Case) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतुल व अमित गोयल यांनी बनावट खरेदी खताद्वारे बिबवेवाडीतील जमिनीवर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे झोपडपट्टी पुनर्वसनाचा (SRA) प्रस्ताव (Slum Rehabilitation Authority) दाखल करून मूळ जागामालक, वारसदार आणि शासनाची फसवणूक (Cheating With Government) केली असा गुन्हा दाखल (Pune Crime) झाला आहे.

अतुल जयप्रकाश गोयल Atul Jaiprakash Goel (वय 47, रा. पूना क्लब समोर) अमित जयप्रकाश गोयल Amit Jaiprakash Goel (वय 40),
मयत कैलास किसन तिकोणे (रा. कसबा पेठ), छगन फक्कडराव थोरवे (रा. तुळशी नगर,
बिबवेवाडी) अशी गुन्हा (Pune Crime) दाखल झालेल्यांची नावे आहेत.
या प्रकरणी राहुल कैलास त्रिकोणे Rahul Kailas Tikone (वय 50,  रा. कसबा पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी राहुल तिकोणे यांच्या पत्नी संगीता तिकोणे (Corporator Sangita Tikone) या पुणे महानगरपालिकेच्या
(Pune Corporation) नगरसेविका आहेत.

बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे
(Senior Police Inspector Sunil Zaware) यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले,
की फिर्यादी राहुल तिकोणे यांची बिबवेवाडी येथे सर्वे नंबर 659/10, 659/12बी,  660/ 04 येथे जमीन आहे.
या जमिनीवर सध्या झोपडपट्टी अस्तित्वात आहे. राहुल तिकोणे यांचे वडील कैलास किसनराव तिकोने यांनी
आणि फक्कडराव थोरवे या दोघांनी अधिकार नसताना बिबवेवडीतील मिळकतीचे कुलमुखत्यारपत्र तयार केले.
2006 साली गोयल गंगा ग्रुपचे अमित गोयल यांना हे कुलमुखत्यार पत्र (Power of Attorney) करून दिले.
अमित व अतुल गोयल यांनी त्याआधारे खोटे खरेदीखत (False Purchase Deed) तयार केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे खरेदीखत खरे असल्याचे भासवित त्याआधारे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या कार्यालयामध्ये (SRA Office, Pune) झोपडपट्टी पुनर्वसन प्रस्ताव दाखल केला. या झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम सुरू झाल्यानंतर राहुल तिकोणे यांना याबाबत माहिती मिळाली. त्यांनी हे काम थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती काढून पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी ( fraud case) हा गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील झावरे करीत आहेत.

Web Title : Pune Crime | fraud case against Goel Ganga Group Atul Goel and Amit Goel, attempts to implement SRA project through fake purchase Deed Bibvewadi police station

IND Vs PAK Cricket Series | भारत-पाकिस्तान सीरीजची योजना बनवत ‘हे’ क्रिकेट बोर्ड, चेयरमनने केला खुलासा

Pune Crime | भारत-न्यूझीलंड सामन्यावर सट्टा घेताना तिघांना अटक; 20 लाखाचा मुद्देमाल जप्त

Sameer Wankhede | ‘NCB ने माझ्या मुलाला खोट्या गुन्ह्यात अडकवलं’, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्तांचा (ACP) आरोप