Pune Crime | फसवणूक प्रकरण ! एम. जी. एन्टप्रायजेसच्या अलनेश सोमजीची येरवडा कारागृहात रवानगी; पत्नी डिंपल सोमजीच्या जामीनावर सोमवारी सुनावणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | गुंतवणूक (Investment) केलेल्या रक्कमेवर वार्षिक 24 टक्के परतावा (24 percent return) देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील (Pune Crime) अनेक नागरिकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एम.जी. एन्टप्रायजेसच्या (M.G. Enterprises) अलनेश अकील सोमजी (Alnesh Akil Somji), डिंपल अलनेश सोमजी Dimple Alnesh Somji (दोघे रा. अमर वेस्टव्हिड, लेन नं. 5, कोरेगाव पार्क, पुणे) यांना पुणे गुन्हे शाखेच्या (Pune Crime) खंडणी विरोधी पथकाने (Anti extortion Cell) दिल्ली विमानतळावरुन (Delhi Airport) ताब्यात घेतले. अलनेश सोमजी याची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला आज (शुक्रवार) पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने अलनेश सोमजी याला न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तर डिम्पल सोमजीच्या जामीन अर्जावर सोमवारी (दि.15) सुनावणी होणार आहे.

 

अलनेश सोमजी आणि त्याची पत्नी डिंपल सोमजी यांनी पुण्यातील नागरिकांना 24 टक्के वार्षिक पतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यावधी रुपयांची फसवणूक (Pune Crime) केली. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर सोमजी दाम्पत्य फरार झाले होते. आरोपी देशाबाहेर पळून जाऊ नयेत यासाठी पुणे पोलिसांनी 29 ऑक्टोबर रोजी सोमजी दाम्पत्याविरोधात लुकआऊट नोटीस (Lookout notice) जारी केली होती.

 

दिल्ली येथून पुण्यात आणल्यानंतर सोमजी दाम्पत्याला शिवाजीनगर न्यायालयात (Shivajinagar Court) हजर करण्यात आले होते.
अलनेश सोमजी याची आज पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले.
न्यायालयाने त्याला न्यायलयीन कोठडी सुनावली असून त्याची रवानगी येरवडा कारागृहात (Yerawada Jail) करण्यात आली आहे.
दरम्यान, डिम्पल सोमजी हिने जामीनासाठी अर्ज (Bail application) दाखल केला आहे. या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी (Pune Crime) होणार आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addi CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate) यांच्या मार्गदर्शनाखाली (Pune Police Crime Branch)
पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhare) हे प्रकरणाचा तपास करत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Fraud case! Alnesh Somji of M. G. Enterprises sent to Yerawada Jail; Wife Dimple Somji’s bail hearing on Monday

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

LPG Cylinder | जर गॅस सिलेंडरने घडली असेल दुर्घटना तर मिळेल 50 लाख रुपयांची भरपाई, जाणून घ्या कशी?

High Court | ‘पूर्वी लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी घेतलेली संमती भविष्यातही लागू होणार नाही’ – हाय कोर्ट

Multibagger Stock | ‘या’ स्टॉकने गुंतवणुकदारांना केले ‘मालामाल’, महिनाभरात दिला मल्टीबॅगर रिटर्न, तुमच्याकडे आहे का?