Pune Crime | फसवणूक प्रकरण ! एम.जी. एन्टप्रायजेसच्या डिंपल सोमजीला सशर्त जामीन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गुंतवणूक (Investment) केलेल्या रक्कमेवर वार्षिक 24 टक्के परतावा (24 percent return) देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील (Pune Crime) अनेक नागरिकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या अलनेश अकील सोमजी (Alnesh Akil Somji), डिंपल अलनेश सोमजी Dimple Alnesh Somji (दोघे रा. अमर वेस्टव्हिड, लेन नं. 5, कोरेगाव पार्क, पुणे) यांना पुणे गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch Police) खंडणी विरोधी पथकाने (Anti extortion Cell) दिल्ली विमानतळावरुन (Delhi Airport) अटक केली होती. या प्रकरणात डिंपल सोमजी हिला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एस. गोसावी (Additional Sessions Judge S.S. Gosavi) यांनी एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजुर (Conditional bail granted) केला आहे.
अतिरिक्त सत्र न्यायालयाने डिंपल सोमजीला सशर्त जामीन मंजूर करताना महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसात कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन
(Koregaon Park Police Station) येथे सकाळी 10 ते 12 या वेळेत हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच 8 दिवसांत पासपोर्ट जमा करण्याचे आदेश न्यायलायने दिले आहे.
याशिवाय न्यायालयाच्या परवानगी शिवाय देशाबाहेर न जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अखिलेश सोमजी आणि त्याची पत्नी डिंपल सोमजी यांनी पुण्यातील नागरिकांना 24 टक्के वार्षिक पतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली.
याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सोमजी दाम्पत्य फरार झाले होते.
आरोपी देशाबाहेर पळून जाऊ नयेत यासाठी पुणे पोलिसांनी 29 ऑक्टोबर रोजी सोमजी दाम्पत्याविरोधात लुकआऊट नोटीस (Lookout notice) जारी केली होती.
Web Title : Pune Crime | Fraud case! M.G. Dimple Somji of Enterprises conditional bail
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवाराच्या भेटीला; चर्चेला उधाण