Pune Crime | फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने 41 लाखांची फसवणूक, दोघांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | इमारतीमधील फ्लॅट विक्री करण्याच्या बहाण्याने 41 लाख रुपयांची फसवणूक (Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) आयपीसी IPC 420, 406, 34 नुसार दोघांवर गुन्हा (Cheating Case) दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी (Pune Police) उमेश श्रीकांत जोग Umesh Srikant Jog (वय – 42), सूर्यकांत दिनकर भगत Suryakant Dinkar Bhagat (वय – 50 रा. रायगड – Raigad) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

याबाबत प्रकाश तुकाराम साठे Prakash Tukaram Sathe (वय – 37 रा. एरंडवणा – Erandwana) यांनी खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार मार्च 2008 ते 30 एप्रिल 2022 या कालावधीत शुक्रवार पेठ (Shukrawar Peth) येथे घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उमेश जोग आणि सुर्यकांत भगत यांनी संगणमत करुन फिर्याद यांचा विश्वास संपादन केला. त्यांनी त्यांच्या मिळकतील रेणुका निवास या इमारतीमधील प्लॅट फिर्यादी यांना दाखवला. या फ्लॅटवरील लोन निल करुन खरेदी खत करुन देतो असे सांगून आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून 41 लाख 5 हजार रुपये घेतले. (Pune Crime)

पैसे घेऊन ही आरोपींनी फ्लॅट फिर्यादी यांच्या नावावर न करता त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत फिर्यादी यांनी परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त यांच्याकडे तक्रार अर्ज केला होता.
पोलीस उपायुक्त यांच्या आदेशावरुन पोलिसांनी उमेश जोग आणि सुर्यकांत भगत यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | Fraud Cheating Case Khadak Police Station FIR against Umesh shrikant jog and Suryakant Dinkar Bhagat

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा