Pune Crime | माजी नगरसेवकाची एक कोटीची फसवणूक; अशोक गोयल आणि समीर गोयलविरूध्द गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पिंपरी येथील काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची (Former Congress Corporator) सुमारे एक कोटीची फसवणूक (Fraud Case) केल्याची घटना (Pune Crime) घडली आहे. जागेच्या व्यवहारामध्ये सुमारे 99 लाख 35 हजार रुपये घेऊन नोटरी करारनामा केला. त्यानंतर बाकी रक्कम देण्यास तयार असून देखील खरेदीखत न करताही फसवणूक (Cheating Case) केली. ही धक्कादायक घटना पिंपरी येथील खराळवाडी (Kharalwadi) मध्ये जानेवारी 2015 ते 21 एप्रिल 2022 या कालावधी दरम्यान घडली.

 

याप्रकरणी सद्‌गुरू महादेव कदम (Sadhguru Mahadev Kadam) (वय, 50, रा. खराळवाडी, पिंपरी) यांनी शुक्रवारी (22 एप्रिल) रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे. या तक्रारीनंतर अशोक रामेश्‍वर गोयल (Ashok Rameshwar Goyal) (वय, 70) आणि समीर अशोक गोयल (Sameer Ashok Goyal) (वय, 40, दोघेही रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

याबाबत माहिती अशी की, आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी सद्‌गुरू कदम यांना खराळवाडी येथील इमारतीपैकी तिसऱ्या मजल्यावरील बांधकाम व त्यावरील संपूर्ण टेरेस विकत घेण्यासाठी 99 लाख 35 हजार रुपये आरोपी यांना दिले.
त्यानुसार आरोपींनी नोटरी करारनामाही करून दिला.
फिर्यादी हे बाकी 10 लाख 65 हजार रुपये देण्यास तयार असताना देखील आरोपींनी खरेदीखत करून देण्यास टाळाटाळ केली.
यानंतर फिर्यादी कदम यांनी पोलिसात धाव घेतली आहे.
याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) भोजराज मिसाळ (Police Inspector Bhojraj Misal) करत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | fraud cheating case of crore with former congress corporator pimpri police FIR against Ashok Rameshwar Goyal and Sameer Goyal

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा