Pune Crime | दीड कोटींच्या फसवणूक प्रकरणी मॅप्स इंडस्ट्रिज इंडिया प्रा. लि., ओम एंटरप्रायझेसचे मालक सचिन धनशेट्टीसह 8 जणांविरूध्द गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | इंटरनेटसाठी (Internet) सध्या मोठी मागणी आहे. त्यामुळे वेगवेगळ्या कंपन्या शहरभर आपल्या केबलचे जाळे विस्तारीत आहेत. अशा वेळी गोदामातून केबल व इतर साहित्य घेऊन त्यातील निम्मे साहित्याची परस्पर विक्री केली. त्यानंतर बनावट मेजरमेंट बुक शीट (Fake Measurement Book Sheet) तयार करुन काम केले नसतानाही केल्याचे दाखवून साहित्य लावल्याची मजूरी म्हणून तब्बल दीड कोटी रुपयांची यु ब्रॉड ब्रॅन्डची (You Broad Brand) फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी (Chaturshringi Police) ८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

 

समीर शेख (रा. घोरपडी गाव), सुधाकर माणिकराव लेकुले (रा. हिंगोली), मनोज तिवारी (रा. तळेगाव दाभाडे), मंगेश भगवान सरतापे, साजिद बादशहा शेख (रा. वारजे माळवाडी), मॅप्स इंडस्ट्रिज इंडिया प्रा. लि. खेसे पार्क, लोहगाव), ओम एंटरप्रायझेसचे मालक सचिन गंगाधर धनशेट्टी (रा. गुरुवार पेठ) आणि योगेश होटकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी गिरीश गोपीनाथन नायर (वय ४३, रा. मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार औंध येथील यु ब्रॉड ब्रॅण्डचे वर्क लॅबमध्ये एप्रिल २०२० ते सप्टेबर २०२१ दरम्यान घडला आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आपसात संगनमत करुन फिर्यादीचे ब्रॉड ब्रॅण्डचे वर्क लॅब व गोदामामधून ओएफसी व एच एफ सी साहित्य घेतले.
या घेतलेल्या साहित्यापैकी निम्मे साहित्य लावले.
उर्वरित साहित्याची परस्पर विक्री करुन सर्व साहित्य लावल्याचे बनावट मेजरमेंट बुक शीट तयार केली.
त्यावर सह्या केल्या. या मेजरमेंट बुक शीटच्या आधारे मॅप्स इंडस्ट्रिज इंडिया प्रा. लि. (Maps Industries India Pvt. Ltd) व ओम एंटरप्रायझेस यांनी कंपनीस बिल दिले. नायर यांच्या कंपनीकडून घेतलेले साहित्य व हे साहित्य लावल्याची मजूरी म्हणून ओम एंटरप्रायझेस यांनी १७ लाख ४६ हजार ३४६ रुपये व मॅप्स इंडस्ट्रिज कंपनीने १ कोटी २९ लाख ४३ हजार २७८ रुपये असे एकूण १ कोटी ४७ लाख ४३ हजार ६२४ रुपयांची कंपनीची फसवणूक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचौरे (Senior Police Inspector Rajkumar Waghchaure) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Fraud Cheating Case Om Enterprises Sachin Dhanshetti Maps Industries India Pvt. Ltd Chaturshringi Police Station Pune

 

Advt.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा