Pune Crime | पंतप्रधान मुद्रा फायनान्सचे कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पंतप्रधान मुद्रा फायनान्सचे (Prime Minister Mudra Finance) कर्ज (Loan) मिळवून देण्याचा बहाणा करुन प्रोसेसिंग फीच्या नावाखाली भामट्यांनी २ लाख ५ हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा (Online Fraud) घातल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)
याप्रकरणी कर्वेनगर येथील एका २२ वर्षाच्या तरुणाने वारजे पोलीस ठाण्यात (Warje Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३१३/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संतोष कुमार (Santosh Kumar), दीपक कुमार (Deepak Kumar), ओहम रतन (Ohm Ratan), जयकिशन (Jaykishan) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार २६ नोव्हेबर २०२१ व त्यानंतर ७ ते ८ दिवसांच्या दरम्यान घडला. (Pune Crime)
उद्योजकता वाढीस लागावी, यासाठी पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना (Pradhan Mantri Mudra Loan Scheme) केंद्र सरकारने (Central Government) सुरु केली आहे. त्यात कमी व्याज दरात तरुणांना कर्ज मिळते. फिर्यादी यांनी मुद्रा फायनान्स यांच्याकडे वैयक्तिक कर्ज मिळविण्यासाठी अर्ज केला होता. त्यांना संतोष कुमार याने फोन करुन कर्ज मिळवून देतो, असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर प्रोसेसिंग फी (Processing Fees) व कर्ज ट्रान्सफर (Loan Transfer) करण्यासाठी अशी वेगवेगळी कारणे सांगून त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यावर २ लाख ५ हजार रुपये ऑनलाईन पाठविण्यास भाग पाडले. त्यानंतरही फिर्यादी यांना कर्ज मिळाले नाही. त्यामुळे आपली फसवणूक (Cheating Case) झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी तक्रार दिली असून पोलीस निरीक्षक बागवे (Police Inspector Bagway) तपास करीत आहेत.
Web Title : – Pune Crime | Fraud in the guise of getting a loan from Pradhan Mantri Mudra Finance
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update