Pune Crime | आर्मीमध्ये नोकरी देण्याच्या आमिषाने फसवणूक, ‘पिंपरी’ पोलिसांकडून सैन्यातून निवृत्त झालेल्या दोघांसह एजंट गजाआड

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | विविध भरती परीक्षांचे पेपर फुटी प्रकरणात पुणे पोलिसांकडून (Pune Police) कारवाई होत असताना पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police) आर्मीमध्ये नोकरी देण्याच्या आमिषाने (Army Enlistment Lure) फसवणूक (Fraud) करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. मिलिटरी इंटेलिजन्सने (Military Intelligence) तिघांना ताब्यात घेऊन सांगवी पोलिसांच्या ताब्यात दिले. सांगवी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली. अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आर्मिमधून सेवानिवृत्त झालेल्या दोघांचा समावेश आहे. आरोपींनी आर्मीमध्ये बॉर्डर रोडस ऑर्गनायझेशन (GREF) मध्ये व्हेईकल मेकॅनिक (Vehicle Mechanic) या पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणांकडून हजारो रुपये घेऊन फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

 

सतीश कुंडलिक डहाणे Satish Kundlik Dahane (वय-40 रा. औंध मिलिटरी कॅम्प, पुणे), श्रीराम बनाजी कदम (Shriram Banaji Kadam), अक्षय देवलाल वानखेडे Akshay Devlal Wankhede (रा. तेल्हारा, ता. तेल्हारा, जि. अकोला-Akola) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत गजानन पुरुषोत्तम मिसाळ Gajanan Purushottam Misal (वय-23 रा. भातकुली, ता. भातकुली, जि. अमरावती-Amravati) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi police station) फिर्याद दिली आहे. सतीश डहाणे आणि  श्रीराम कदम हे सैन्य दलातून निवृत्त (Retired) झाले आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे अमरावती येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागामध्ये मोटार मेकॅनिक पदावर अ‍ॅप्रेंटीसशिप करत आहेत. फिर्यादी यांचा मित्र धनंजय वट्टमवार (Dhananjay Vattamwar) यांना आरोपी अक्षय वानखेडे याने बॉर्डर रोडस ऑर्गनायझेशन (Border Roads Organization) या आर्मीच्या भरतीमध्ये (Army Recruitment) व्हेईकल मेकॅनिक या पदासाठी नोकरी लावतो असे आमिष दाखवले. हे काम सतीश डहाणे याच्या सांगण्यावरुन करत असल्याचे अक्षयने सांगितले. त्यानुसार फिर्यादी व त्यांच्या मित्राकडून भरतीसाठी 70 हजार रुपये घेतले. (Pune Crime)

त्यानंतर फिर्यादी व त्यांचे मित्र धनंजय वट्टमवार (वय-21) नीलेश ईश्वर निकम (वय-23 रा. मु.पो. आगार खुर्द, ता. मालेगाव, जि. नाशिक-Nashik), अक्षय बाळु साळुंखे (वय-25 रा. खेडगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव -Jalgaon), अक्षय बाळु साळुंखे (वय-25 रा. खेडगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) हे 4 जानेवारी 2022 रोजी दुपारी तीनच्या सुमारास औंध मिलिटरी कॅम्पच्या (Aundh Military Camp) समोरील रक्षक चौकात भरतीसाठी आले.

 

दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिलिटरी इंटेलिजन्सला  समजली. मिलिटरी इंटेलिजन्सने फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना ताब्यात घेऊन सांगवी पोलिसांना याबाबत कळवले. पोलिसांनी तिनी आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून आर्मी भरतीसाठी लागणारी कागदपत्रे, रोख रक्कम, कॉम्प्युटर, पेन ड्राईव्ह, दोन दुसऱ्याच्या नावे असलेले रबरी शिक्के, मिलिटरीचे स्वत:चे बनावट ओळखपत्र, वेगवेगळी बनावट एनव्हलप, कमांडंट ग्रेफ सेंटर यांचे अ‍ॅकनॉलेज कार्ड, बीआरओचे भरतीचे अ‍ॅडव्हटाईज नंबर 2/2021 चे उमेदवारांचे भरलेले फॉर्म, इत्यादी कागदपत्रे, तसेच उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेची झेरॉक्स प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅनकार्ड व आटीलरी नाशिक रोड कॅम्प यांचे अॅप्लिकेशन फॉर्म इत्यादी ताब्यात घेतले.

 

आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना नोकरी लावतो, असे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे समोर आले. त्यानुसार गुन्हा दाखल करुन पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (CP Krishna Prakash) यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे (Senior Inspector of Police Sunil Tonpe) यांच्या सुचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक नानाश्री वरुडे (PSI Nanashree Varude) करीत आहेत.

मोठे रॅकेट असण्याची शक्यता
आर्मीच्या बॉर्डर रोडस ऑर्गनायझेशन मध्ये व्हेईकल मेकॅनिक या पदासाठी 30 ऑक्टोबर 2021 रोजी लेखी परीक्षा झाली होती.
या भरती प्रक्रियेत भरती करण्याच्या आमिषाने अनेकांना गंडा घातला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्यासाठी यामध्ये मोठे रॅकेट असण्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

 

पोलिसांकडून सखोल चौकशी 
आरोपी सतीश डहाणे हा सैन्यदलात शिपाई तर श्रीराम कदम हा गंवंडी म्हणून सैन्य दलात कार्यरत होते.
आरोपी अक्षय वानखेडे हा याप्रकरणात एजंट म्हणून काम करीत होता, असे तपासात समोर आले आहे.
यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? तसेच आरोपींनी आणखी किती जणांची फसवणूक केली आहे, याचा पोलीस कसून तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | fraud lure enlistment army agent arrested pimpri chinchwad police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Aadhar Card बाबत नियमांमध्ये ‘हा’ बदल! जाणून न घेतल्यास लाभापासून राहाल वंचित

Coronavirus in Maharashtra | अत्यंत चिंताजनक ! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 36265 नवे रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

National Pension Scheme | सरकारच्या ‘या’ पेन्शन पॉलिसीमध्ये करा गुंतवणूक, मॅच्युरिटीवर जमा होतील कोटी रुपये; दरमहिना 27,000 च्या जवळपास येईल रक्कम