Pune Crime | फ्लॅट विकत देण्याच्या बहाण्याने चौघांची फसवणूक; प्रमोद दोडकेविरूध्द गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आपण मुळ जागा मालक असून सोसायटीमध्ये आपल्या वाट्याला येणारे फ्लॅट विकत देण्यापोटी कोट्यवधी रुपये घेऊन एकाने चौघांची फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime) याप्रकरणी चेतन आनंद पांड्याजी (वय ३४, रा. कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रमोद विश्वनाथ दोडके Pramod Vishwanath Dodke (वय ५४, रा. अमित ब्लूम फिल्म, आंबेगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

हा प्रकार जुलै २०१८ पासून आंबेगाव (Ambegaon) येथील तारा वेस्ट ब्रुक फिल्ड सोसायटीतील फ्लॅटबाबत घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद दोडके याने आपण तारा वेस्ट ब्रुक फिल्ड सोसायटीच्या (Tara Westbrook Field Society) मुळ जागेचे जागा मालक आहोत.
या सोसायटीमध्ये ज्यांचे वाट्याला येणारे फ्लॅटपैकी फ्लॅट क्रमांक बी ४०१ हा फ्लॅट विकत देतो, असे फिर्यादी यांना दोडके यांनी सांगितले.
त्याबदल्यात त्यांच्याकडून २५ लाख रुपये घेतले. (Pune Crime) प्रत्यक्षात त्यांना फ्लॅट न देता त्यांनी दिलेली रक्कमही परत केली नाही.
त्यांच्या प्रमाणेच आरती एकनाथ फिरंगे, अनिता जयंत खाडीलकर व आंनद करपे यांचीही अशाच प्रकारे आर्थिक फसवणूक (Fraud Case) केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक थोरात अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Fraud of four under the pretext of buying a flat Crime filed against Pramod Dodke

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा