Pune Crime | कंपनीच्या महिला संचालकाचा परस्पर राजीनामा मंजूर करुन लाखो रुपयांची फसवणूक, 4 जणांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कोऱ्या कागदावर सह्या घेऊन त्यावर परस्पर राजीनामा (Resignation) लिहून कंपनीच्या मिटींगमध्ये तो मंजूर (Approved) करुन एका महिला संचालकाची (Female Director) फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) आयपीसी 417, 420, 471, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पोलिसांनी (Pune Police) चंद्रशेखर त्र्यंबकराव देशमुख (Chandrasekhar Trimbakrao Deshmukh), दिपक गोपीनाथराव अपशिंगेकर (Deepak Gopinathrao Apshingekar), विजयकुमार बाबासाहेब शितोळे (Vijaykumar Babasaheb Shitole), अजित चंद्रकांत निंबाळकर (Ajit Chandrakant Nimbalkar) यांच्यावर गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

 

याबाबत 40 वर्षीय महिला संचालकाने न्यायालयात याचिका (Court Petition) दाखल केली होती.
न्यायालयाच्या आदेशानुसार कोथरुड पोलिसांनी आयपीसी 156A (3) नुसार चार जणांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार 26 एप्रिल 2021 मध्ये पुण्यातील (Pune Crime) कोथरुड येथील किंगबर्ड टेक्नॉलॉजी प्रा. लि. (Kingbird Technology Pvt. Ltd. Kothrud) कंपनीत घडला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या किंगबर्ड टेक्नॉलॉजी प्रा. लि. कंपनीमध्ये संचालक म्हणून कार्यरत होत्या.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींनी संगनमत करुन 26 एप्रिल 2021 रोजी कंपनीची मिटींग (Company Meeting) घेतली.
या मिटींगबाबत फिर्यादी यांना कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती.
आरोपींनी फिर्यादी यांच्या नाशिक येथे 10 ते 12 कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या होत्या.
त्या कोऱ्या कागदापैकी एका कागदावर फिर्यादी यांचा राजीनामा लिहिला.

फिर्यादी यांचा राजीनामा त्यांच्या परस्पर मिटींगमध्ये सादर केला.
तसेच संचालक मंडळाने त्यांचा राजीनामा मंजूर करुन त्यांच्या संमतीशिवाय कंपनी ऑफ रजिस्टर (Company of Register) यांना फिर्यादी यांनी राजीनामा दिल्याची खोटी माहिती दिली.
तसेच कंपनी स्थापन झाल्यापासून त्यांना कोणत्याही प्रकारचा आर्थिक फायदा न देता फिर्यादी व त्यांच्या पतीकडून घेतलेल्या 5 लाख 88 हजार रुपयांचा आरोपींनी अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Fraud of lakhs of rupees by accepting mutual resignation of female director of the company FIR against 4 persons

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा