Pune Crime | पुणे महापालिकेच्या कस्टमर केअरऐवजी भलत्याच क्रमांकावर संपर्क साधल्याने दीड लाखांची फसवणुक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे महापालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) वेबसाईटवर जाऊन कर (Pune PMC Tax) भरल्यानंतर राहिलेला कर भरणा होत नसल्याने तरुणीने महापालिकेच्या कस्टमर केअर (PMC Customer care) ऐवजी भलत्याच क्रमांकावर संपर्क साधला. सायबर चोरट्यांनी (Pune Cyber Crime) ही संधी साधत त्यांना १ लाख ४१ हजार रुपयांना गंडा घातला. (Pune Crime)

 

याप्रकरणी मोहमंदवाडीत एका ४४ वर्षाच्या नागरिकाने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७५४/२२) दिली आहे. हा प्रकार २६ जानेवारी २०२२ रोजी घडला होता. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीने मोबाईलवरुन त्यांच्या पत्र्याचे शेडचा कर पुणे महानगर पालिकेच्या संकेतस्थळावर (PMC Website) जाऊन ऑनलाईन १ लाख रुपयांचा कर भरला. त्यानंतर राहिलेला कर भरणा होत नव्हता. तेव्हा त्यांनी त्याच वेबसाईटवर असलेला कॉल सेंटरला (Call Center) कॉल करण्याऐवजी गुगलवर जाऊन कस्टमर केअर क्रमांक शोधला. सार्वजनिक संस्थांचा कॉल सेंटर क्रमांक हा १८०० क्रमांकाने सुरु होत असतो.

 

गुगलवर मिळालेल्या चुकीच्या क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला. तेव्हा त्याने एनी डेक्स रिमोट डेक्सटॉप हे अ‍ॅप डाऊन लोड करायला सांगितले.
त्यांनी ते डाऊनलोड करताच त्यांच्या खात्यातून १ लाख ४१ हजार रुपये ट्रान्सफर करुन घेण्यात येऊन त्यांची फसवणूक (Fraud Case) केली.
सहायक पोलीस निरीक्षक बाबर (Assistant Police Inspector Babar) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Fraud of one and a half lakhs by contacting the
wrong number instead of customer care of Pune Municipal Corporation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा