Pune Crime | वाघोली येथील जमीन नावावर करुन देऊन विक्रीत मोठा नफा कमवून देण्याच्या आमिषाने 1 कोटींची फसवणूक
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | वाघोली येथील जमीन नावावर करुन देतो, असे सांगून तसेच त्याची विक्री करुन मोठा नफा कमवून देतो, असे सांगून 1 कोटी रुपये घेऊन फसवणूक (Cheating) केली. पैसे परत मागितल्यावर महिलेला जीवे मारण्याची धमकी (Death Threats) दिल्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.
याप्रकरणी मुकुंदनगर (Mukundnagar) येथील एका 31 वर्षाच्या महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी संतोष गव्हाणे Santosh Gavane (वय ४५, रा. भोसरी – Bhosari) याच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार बुधवार पेठेतील तिरंगा टॉवर (Tiranga Tower, Budhwar Peth) येथे जुलै 2019 पासून आजपर्यंत घडला आहे. (Pune Crime)
—
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष गव्हाणे याने फिर्यादी यांच्या वडिलांना वाघोली (Wagholi) येथील जमीन नावावर करुन देतो, असे आश्वासन दिले. तसेच त्याची विक्री करुन मोठा नफा कमवून देतो, असे आमिष दाखविले. त्यांच्याकडून वेळोवेळी रोख व बँक खात्याद्वारे एकूण 1 कोटी रुपये घेतले. मात्र, त्यानंतरही कोणत्याही प्रकारे जमीन नावावर करुन दिली नाही. फिर्यादी यांच्या वडिलांच्या निधनानंतर फिर्यादी यांनी वेळोवेळी वारंवार व्यवहार पूर्ण करण्यास सांगितले. नाही तर घेतलेले पैसे परत देण्याची विनंती केली. तेव्हा आरोपी गव्हाणे यांनी फिर्यादी व फिर्यादी यांच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन तसेच शिवीगाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक शेटे (API Shete) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Fraud of Rs 1 crore for sale of land in Wagholi
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update