Pune Crime | BYJU कंपनीच्या नावाने तब्बल 1 कोटींची फसवणूक

पुणे : Pune Crime | मुलांच्या ऑनलाईन शिक्षणाचे अ‍ॅप म्हणून लोकप्रिय ठरलेल्या BYJU थिंग अँड लर्न लिमिटेड (byju’s think and learn pvt ltd) या कंपनीच्या नावाने तब्बल १ कोटी रुपयांची फसवणूक (Pune Crime) केल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी निखील वसंत कदम (वय ३५, रा. काळेवाडी, पिंपरी) यांनी खडक पोलिसांकडे (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रकाश आनंद माने (रा. गोपाळनगर, वरळी, मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शुक्रवार पेठेतील (shukrawar peth) पानघंटी चौकात १० ऑक्टोबर २०२० रोजी घडला होता.

प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील मुलांना ऑनलाईन शिक्षण देणारे अ‍ॅप थिंग अँड लर्न या कंपनीने बायजुस या नावाने काढले आहे. लॉकडाऊनच्या काळात त्याचा मोठ्या प्रमाणावर प्रचार झाला. मुळची ही कंपनी बंगलोरची आहे. असे असताना आरोपीने फिर्यादी यांना पश्चिम बंगाल येथे बायजुस थिंग अँड लर्न ही कंपनी असून त्या कंपनीमध्ये १ कोटी रुपये गुंतवणुक केल्यास कंपनी १ कोटी ३० लाख रुपये देते असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने आरोपीला १ कोटी रुपये रोख दिले. त्यानंतर आता वर्ष होत आले तरी ही रक्कम परत न केल्याने निखिल कदम यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फसवणूकीची तक्रार दिली आहे.

हे देखील वाचा

Earn Money | नोकरी सोडून 2 लाखात सुरू करा ‘हा’ व्यवसाय, थेट 4 लाखाचा होईल नफा; सरकार देईल आर्थिक मदत

तुमच्या Aadhaar द्वारे किती मोबाइल नंबर आहेत रजिस्टर्ड? ‘या’ वेबसाइटवरून तपासा; 2 राज्यांमध्ये मिळेल विशेष सुविधा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | Fraud of Rs 1 crore in the name of byju’s think and learn pvt ltd

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update