Pune Crime | 24 कॅरेटचे सोने देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची 10 लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | २४ कॅरेट चोख सोने (Solid Gold) देण्याच्या आमिषाने खडकी बाजार (Khadki Bazar) येथील एका व्यावसायिकाची १० लाख रुपयांची फसवणूक (Fraud Case) करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी श्रीपाल निहालचंद शाह Shripal Nihalchand Shah (वय ४६, रा. खडकी बाजार) यांनी खडकी पोलीस ठाण्यात (Khadaki Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार अवि संजय जैन Avi Sanjay Jain (रा. कमल कुंज, चिवडा गल्ली, लालबाग, मुंबई – Lalbaug Mumbai) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २८ डिसेंबर २०२१ ते १९ फेब्रुवारी २२ दरम्यान घडला आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीपाल शाह यांचे खडकीमध्ये ज्वेलर्सचे दुकान आहे.
त्यांनी आरोपीच्या एस पी गोल्ड अ‍ॅपवर २८ डिसेंबर रोजी १०० ग्रॅम चोख सोने ऑर्डर केली.
४७ हजार ९९० रुपये प्रति तोळा याप्रमाणे त्याचे ४ लाख ७९ हजार ९०० रुपये झाले.
त्यानंतर दुसर्‍या दिवशी आणखी १०० ग्रॅम चोख सोने ४७ हजार ६८०  रुपये प्रति तोळा या भावाने  ऑर्डर केली.
त्याचे एकूण ९ लाख ८६ हजार ३९६ रुपये त्यांनी ३१ डिसेंबर २०२१ रोजी आरोपीच्या एस पी गोल्डच्या बँक खात्यात जमा केले.
तरीही आरोपीने २०० ग्रॅम सोने न देता व खरेदी पोटी  ऑनलाइन घेतलेले पैसे परत न करता फसवणूक केली असल्याचे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक कदम अधिक तपास करत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Fraud of Rs 10 lakh for lure of 24 carat gold

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1635 नवे रुग्ण, राज्याचा रिकव्हरी रेट 97.89 %, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Nagpur Crime | क्रिप्टो करेंसीच्या नावाखाली अनेकांची कोट्यावधीची फसवणूक, साथिदाराचा खून करुन फरार झालेल्या आरोपीला पुण्यातून अटक; 1 कोटीचा मुद्देमाल जप्त

 

PMC Draft Ward Structure | पुणे मनपाच्या प्रारुप प्रभाग रचनेवरील हरकतींवर 24 आणि 25 फेब्रुवारीला सुनावणी; बालगंधर्व रंगमंदिरात होणारी सुनावणी ‘वेळापत्रका’ नुसारच

 

Chitra Wagh | ‘महाराज असते तर कडेलोट केला असता या सरकारचा’; भाजपच्या कार्यक्रमाला गेल्याने शिवसेनेच्या आमदाराची भाऊजयला मारहाण !