×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | बनावट कागदपत्र्याद्वारे गाडी घेतल्याचे दाखवून पतसंस्थेची 12.75 लाखांची फसवणूक;...

Pune Crime | बनावट कागदपत्र्याद्वारे गाडी घेतल्याचे दाखवून पतसंस्थेची 12.75 लाखांची फसवणूक; दत्तवाडी पोलिस ठाण्यात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बनावट कागदपत्राद्वारे गाडी घेतल्याचे दाखवून कर्ज घेऊन पतसंस्थेला १२ लाख ७२ हजार रुपयांना गंडा (Cheating Case) घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी राजेंद्र विश्वास कांबळे (वय ४६, रा. सिंहगड रोड) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विक्रम माधवराव इंगळे Vikram Madhavrao Ingle (रा. मंजुळा निवास, वारजे) व इतरांवर गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, राजेंद्र कांबळे हे सिंहगड रोडवरील (Sinhagad Road News) जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेत (Janakalyan Nagari Sahakari Patsanstha) नोकरीला आहेत. विक्रम इंगळे व इतरांनी महिंद्रा चारचाकी गाडी सह्याद्री मोटार येथून खरेदी करण्यासाठी कर्ज मागणी अर्ज केला होता. त्यासाठी सह्याद्री मोटर्सचे इनव्हाईस, RTO फि रिसीट, सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन (RC Book) इत्यादी बनावट कागदपत्रे तयार केली. त्याद्वारे पतसंस्थेची दिभाभुल करुन आयसीआयसीआय बँकेत बनावट खाते काढले.

त्या खात्यावर पतसंस्थेने काढलेला धनादेश स्वीकारुन १२ लाख ७२ हजार ४४५ रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार २० जून ते ७ ऑगस्ट २०२० दरम्यान घडला. हप्ते न भरल्याने पतसंस्थेने चौकशी केल्यावर हा प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) युनिट ३ चे पोलीस उपनिरीक्षक काळे (PSI Kale) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | fraud of Rs 12.75 lakh by showing that he took the vehicle through fake documents FIR at Dattawadi Police Station Janakalyan Nagari Sahakari Patsanstha

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | दारु पिण्यास पैसे न दिल्याने मित्रांनीच मारहाण करुन लुटले; कात्रज परिसरातील घटना

PM Kisan | 12 कोटीपेक्षा जास्त शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी ! e-KYC पूर्ण केल्याशिवाय येणार नाही 10वा हप्ता, जाणून घ्या प्रक्रिया

Whatsapp Cryptocurrency Payment | ‘व्हॉट्सअप’ने केली घोषणा, आता क्रिप्टोकरन्सीमध्ये सुद्धा पैशांचा व्यवहार करू शकतात यूजर्स

Pune Crime | अबब ! पुण्यात चक्क वार्षिक 240 % व्याजदर; व्याजाच्या नावाखाली 12 लाखांची खंडणी मागणारा ‘सावकार’ गजाआड

Gold Price Today | गुंतवणुकदारांसाठी मोठी संधी ! आजही सोन्याच्या भावात घसरण, चांदीही उतरली; जाणून घ्या

Pune Crime | पालघनचा धाक दाखवून उकळली खंडणी; पुण्याच्या कॅम्प परिसरातील एमजी रोडवरील प्रकार, दरोड्याचा गुन्हा दाखल

Must Read
Related News