Pune Crime | BMC मध्ये गर्व्हमेंट सप्लायर्सची ऑर्डर देण्याच्या बहाण्याने 22 लाखाची फसवणूक, परदेशातील व्यापाऱ्यासह तिघांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune Crime |बीएमसीमध्ये (BMC) कोरोना प्रतिबंधक प्रॉडक्टस सप्लाय (Corona Preventive Products Supply) करण्याची गर्व्हमेंट ऑर्डर (Government Order) देण्याचे आमिष दाखवून 22 लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. याबाबत मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात इंग्लंड येथील व्यापाऱ्यासह तिघांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जून 2021 ते 23 ऑगस्ट 2021 दरम्यान सातारा रोडवरील ऋतूराज सोसायटीत घडला आहे.

याप्रकरणी बाँबे सन्स ट्रेडर्सचे (Bombay Sons Traders) मालक विशाल सुरज सिंग (Vishal Suraj Singh), इंग्लंड येथील व्यापारी (Merchants in England) अनिल कृष्णन Anil Krishnan आणि संजिव कुमार (रा. मिरा रोड, मुंबई) यांच्या विरोधात आयटी अ‍ॅक्ट (IT Act) अंतर्गत मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात (Marketyard police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश किरण गांधी Yogesh Kiran Gandhi (वय-31 रा. 41 ऋतूराज सोसायटी, लेन नं. 4, बंधू प्रेम, सातारा रोड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी योगेश गांधी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी बीएमसी मध्ये कोरोना प्रतिबंधक प्रॉडक्टस सप्लायर्सचे वार्षीक दोन ते तीन कोटी रुपयांची उलाढाल असलेले गर्व्हमेंट सप्लायर्सची ऑर्डर देण्याचे आमिष दाखवले.
तसेच जीएसटी (GST) नंबर पाठून विश्वास संपादन केला.
ऑर्डर मिळवण्यासाठी लागणारा खर्च करण्यास सांगून 22 लाख 44 हजार 221 रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले.
पैसे देऊन देखील गर्व्हमेंट सप्लायर्सची ऑर्डर मिळाली नसल्याने फिर्यादी यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पुढील तपास मार्केटयार्ड पोलिसांनी तकरार अर्जाची करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Fraud of Rs 22 lakh under the pretext of placing orders of government suppliers in BMC, FIR against three including foreign traders

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | उंड्री पिसोळी गाव कोंढव्याच्याच हद्दीत राहावे : राजेंद्र भिंताडे

Earn Money | घरबसल्या कमवा 1 लाख रुपये महिना, केवळ करावे लागेल ‘हे’ काम; जाणून घ्या सोपी पद्धत

Pune News | पुण्यातील R डेक्कन मॉलवर शिवसैनिकांनी केली दगडफेक