Pune Crime | कंपनीचा व्यवहार ताब्यात घेऊन 3.31 कोटी रुपयांची फसवणूक, दोघांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | महिन्याला एक लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून कंपनीचा व्यवहार ताब्यात घेऊन 3 कोटी 31 लाख 15 हजार 246 रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पुष्कर राजेंद्र वांगीकर (Pushkar Rajendra Wangikar) आणि पुष्कर मोहन टापरे (Pushkar Mohan Tapre) यांच्यावर दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) आयपीसी IPC 420, 465, 467, 468, 471, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी (Pune Police) तक्रार अर्जाची चौकशी करुन आरोपींविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) केला आहे.

 

याबाबत श्रीकांत मल्हारी नागपुरकर Srikant Malhari Nagpurkar (वय – 67 रा. पद्मावती, पुणे) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पुष्कर वांगीकर (वय – 32 रा. पंढरपुर, सोलापुर), पुष्कर टापरे (वय – 35 रा. कोथरुड, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ऑक्टोबर 2017 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत जयश्री इलेक्ट्रोमिक प्रा. लि. (Jayashree Electromech Pvt. Ltd.) सातारा रोड येथे घडला आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची सातारा रोडवर (Satara Road) सिटी प्राईड सिनेमा (City Pride Cinema) समोर जयश्री इलेक्ट्रोमिक नावाची कंपनी आहे.
आरोपींनी फिर्यादी यांनी प्रति महिना एक लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून त्यांच्या कंपनीचा सर्व व्यवहार स्वत:च्या ताब्यात घेतला.
त्यावेळी कोणताही करारनामा न करता एमओव्ही (MOV) केली. मात्र त्याचे कोणतेही पालन न करता हस्तांतरण करारनामा केला.
हस्तांतरण करारनामा केला मात्र कोणतेही कागदपत्र तयार केले नसल्याने फिर्यादी यांनी कंपनीचा राजीनामा (Resignation) दिला नाही.

आरोपींनी कंपनीच्या व्यवहारातील पैशांबाबत कोणतीही कल्पना न देता पैसे परस्पर त्यांच्या नावावर ट्रान्सफर करुन घेत फिर्यादी यांची 3 कोटी 31 लाख 15 हजार 246 रुपयांची आर्थिक फसवणूक केली.
तसेच या कालावधीत आरोपींनी शासनाचा कोणताही जीएसटी टॅक्स (GST Tax) भरला नसल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रार अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगदाळे (PSI Jagdale) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Fraud of Rs 3.31 crore by seizing company transactions FIR against both

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा