Pune Crime | नोकरीच्या आमिषाने पावणेचार लाखांची फसवणूक; सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | नोकरी देणार्‍या एम एन सी हब कन्संटंट या कंपनीतून बोलत असल्याचे सांगून नोकरी देण्याचे आमिष (Lure Of Job) दाखवून एकाला ३ लाख ६५ हजार रुपयाना गंडा (Fraud Case) घातल्याचे समोर आले आहे (Pune Crime). याप्रकरणी धनकवडीमधील (Dhankawadi) एका ४७ वर्षाच्या नागरिकाने सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakarnagar Police Station) फिर्याद दिली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांना २० ऑगस्ट २०२१ रोजी मोबाईल कॉल आला. त्यात आम्ही हरियानामधील गुडगाव येथील एम एन सी हब कन्संटंट या नोकरी लावणार्‍या कंपनीमधून बोलत असल्याचे त्याने सांगितले. फिर्यादी यांना चांगल्या कंपनीत नोकरी लावतो, असे आमिष दाखवून त्यांना रजिस्टेशन, मेडिकल टेस्ट (Medical Test Before Job) अशी वेगवेगळी कारणे सांगून त्यांना एकूण ३ लाख ६५ हजार ७१७ रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करण्यास भाग पडले (Pune Crime).

 

त्यानंतरही त्यांना कोणतीही नोकरी देण्यात आली नाही. त्यामुळे आपली फसवणूक (Cheating Case) झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली असून पोलीस निरीक्षक मुलाणी तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Fraud of Rs 3.75 lakh for job lure; Filed a case at Sahakarnagar police station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा