Pune Crime | गुंतवणूक केलेल्या रक्कमेचा अपहार करुन 3 कोटीची फसवणूक, पुण्यातील दाम्पत्यावर दत्तवाडी पोलीस ठाण्यात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | भागीदारी संस्थेमध्ये पैसे गुंतविण्यास (Investment) सांगून गुंतवणूकदाराने गुंतवलेल्या रक्कमेचा अपहार करुन दोन ते तीन कोटी रुपयांची फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुंतवणूकदाराने राजेश केशव चव्हाण (Rajesh Keshav Chavan) आणि कल्पना राजेश चव्हाण (Kalpana Rajesh Chavan) या दाम्पत्याविरोधात (Couple) दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी (Pune Police) दोघांविरुद्ध आयपीसी कलम IPC 420, 406, 403, 418, 423, 464, 467, 468, 506, 34 प्रमाणे गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) केला आहे.

 

याबाबत दिलीप बालचंद रायसोनी Dilip Balchand Raisoni (वय – 66 रा. कोंढवा रोड, बिबवेवाडी) यांनी दत्तवाडी पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलिसांनी सदाशिव पेठेत (Sadashiv Peth) राहणाऱ्या चव्हाण दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 2009 ते 2016 या कालावधीत गायत्री सदन (Gayatri Sadan), सदाशिव पेठ येथे घडला आहे. फिर्यादी यांनी शुक्रवारी दोघांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी राजेश चव्हाण याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन त्यांना भागीदारी संस्थेत (Partnership Organization) गुंतवणूक करण्यास भाग पाडले.
फिर्यादी यांनी राजेश चव्हाण यांच्यावर विश्वास ठेवून पैसे गुंतवले होते.
आरोपीने संस्थेचा आर्थिक व्यवहार (Financial Transaction) स्वत:कडे ठेवून स्वत: च्या आर्थिक फायद्यासाठी फिर्यादी यांनी गुंतवणूक केलेल्या रक्कमेचा फायदा करुन घेतला.
तसेच फिर्यादी यांनी गुंतवलेल्या रक्कमेवर मिळालेला नफा (Profit) न देता फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली.
तसेच भागीदारी संस्थेच्या मालकीचा फ्लॅट पत्नी कल्पना चव्हाण यांच्या नावावर केला.
आरोपींनी फिर्यादी यांची दोन ते तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पुढील तपास दत्तवाडी पोलीस करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Fraud of Rs 3 crore by embezzling invested amount FIR against Pune couple at Dattawadi police station

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा