Pune Crime | पुणे महापालिकेला हस्तांतरित केलेली जागा भाड्याने देऊन 38 लाखांची फसवणूक, तिघांवर गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे महापालिकेला Pune Municipal Corporation (PMC) हस्तांतरीत केलेली हॉटेलची जागा भाड्याने देऊन 38 लाखाची फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत पोलिसांनी (Pune Police) तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार डिसेंबर 2019 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत कोथरुड येथे (Pune Crime) घडला आहे.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

 

कुंडलिक वनाजी फाटक (Kundlik Vanaji Phatak), मंगल कुंडलिक फाटक (Mangal Kundlik Phatak), केतन कुंडलिक फाटक Ketan Kundlik Phatak (तिघे रा. बावधन बु., मुळशी) यांच्यावर कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ऋषिकेश शांताराम भरेकर Rishikesh Shantaram Bharekar (वय-29 रा. डावी भुसारी कॉलनी, पौड रोड, कोथरुड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी कोथरुड पोलिसांकडे तक्रार अर्ज केला होता. पोलिसांनी तक्रार अर्जाची चौकशी करुन शुक्रवारी (दि.31 मार्च) गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेव्हन इलेव्हन ईशान हॉटेलची (Seven Eleven Northeast Hotel) जागा फिर्यादी यांना भाड्याने दिली.
जागा भाड्याने देताना आरोपींनी डिपॉझिट (Deposit) म्हणून 18 लाख रुपये रोख व बँक खात्याद्वारे घतले.
दरम्यान, ही जगा रस्ता रुंदीकरणात जाणार असल्याने जागा पुणे महापालिकेकडे हस्तांतरित (Transferred) करण्यात आली होती.
आरोपींना हे माहित असताना देखील फसवणूक करण्याच्या उद्देशाने फिर्यादी यांना जागा भाड्याने दिली.
फिर्यादी यांनी जागा भाड्याने घेतल्यानंतर डागडुजीसाठी 20 लाख रुपये खर्च केले.
हॉटेलची डागडुजी करत असताना आरोपींनी हे हॉटेल महापालिका पाडणार असल्याचे फिर्यादी यांच्यापासून लपवून ठेवले.
आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी यांची 38 लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत ऋषिकेश भरेकर यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता.
पोलिसांनी तक्रार अर्जाची चौकशी करुन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तानाजी पाटील (PSI Tanaji Patil) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Fraud of Rs 38 lakh by renting space transferred to Pune Municipal Corporation, crime against three in kothrud police staton

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | धक्कादायक ! विमाननगर परिसरातील बॅकस्टेज पबमध्ये नेऊन अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे, 19 वर्षाच्या मुलावर FIR

 

Multibagger Stock | टाटाच्या ‘या’ स्टाॅकने गुंतवणूकदार झाले मालामाल; 1 लाख झाले चक्क 2 कोटी, जाणून घ्या

 

Dr. Bharati Pawar | मास्क मुक्तीला केंद्राचा विरोध; राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी स्पष्टच सांगितलं