Pune Crime | दारूविक्रीचा परवाना मिळवून देण्याचे आमिष दाखवुन 40 लाखाची फसवणुक; पुणे पोलिसांकडून दांपत्यास अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | चाळीस लाखांची फसवणुक करणाऱ्या दांपत्याच्या पुणे पोलिसांनी (Pune Police) मुसक्या आवळल्या (Pune Crime) आहेत. दारूविक्रीचा परवाना मिळवून देण्याचे आमिष दाखवून बनावट परवाना देत एका नागरिकाची तब्बल 40 लाख 43 हजार रुपयांची फसवणूक केली होती. सरकारी अधिकारी असल्याचे भासवून दांपत्य नागरिकांची फसवणूक करीत असल्याची माहिती समोर आली होती. शुभम दुर्गेश गौर (Shubham Durgesh Gaur) (वय 34, किडवाईनगर, कानपूर, उत्तर प्रदेश) व त्याची पत्नी रंजना शुभम गौर (Ranjana Shubham Gaur) (वय 31) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. या संशयित आरोपींना शिवाजीनगर पोलिसांनी (Shivajinagar Police Station) उत्तर प्रदेशातून अटक (Arrested) केली आहे.

याबाबत माहिती अशी, संशयित आरोपी शुभम गौर (Shubham Gaur) याने शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या नागरिकास आपण NTC दिल्लीतील सरकारी कार्यालयात सहायक आयुक्त पदावर कार्यरत आहोत, असं सांगितलं. तसेच त्यांना खोटे ओळखपत्र देखील दाखवले. तसेच तुम्हाला दारूविक्रीचा परवाना मिळवून देतो असं संबधित नागरीकाला सांगितलं. असं सांगत अनेकवेळा त्यांच्याकडून ऑनलाइन व रोख अशा स्वरूपात 40 लाख 43 हजार रुपयांची रक्कम बळकावली. त्यानंतर गौर याने त्यांना ‘मेर्स सयुरी वाइन अँड कंपनी’ नावाने बनावट दारू विक्री परवान्याची प्रत दिली. (Pune Crime)

दरम्यान, फिर्यादीने संबंधित परवान्याची चौकशी केली असता, तेव्हा तो परवाना बनावट असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी त्याच्याकडे पैसे मागून देखील गौर कडून प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्यांनी शिवाजीनगर पोलिसांत (Shivajinagar Police Station) धाव घेतली. यावरुन पोलिसांचा तपास सुरू होता. तर, शुभम व रंजना हे दोघेही सतत रहाण्याची जागा बदलत होते. त्यामुळे त्यांचा शोध नेमका घेता येत नव्हता.
खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनंतर संबंधित आरोपी उत्तर प्रदेशातील
(Uttar Pradesh) कानपूर येथे असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली.
त्यानूसार पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून आलिशान फोर्ड इंडेव्हर
कार, 2 मोबाईल व लॅपटॉप जप्त करण्यात आले आहे.

 

Web Title :-  Pune Crime | Fraud of Rs 40 lakh on the pretext of obtaining liquor license; Couple arrested by Pune police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | महाराष्ट्र खंबीर ! उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले – ‘2 वर्षांच्या काळात सरकारला साथ, सहकार्य दिलेल्या, सरकारवर विश्वास व्यक्त केलेल्या तमाम बंधुभगिनी, मातांचे, युवा मित्रांचे आभार’

Ajit Pawar | विना मास्क 500 रुपये तर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास थेट 1000 रुपये दंड आकारण्याचे अजित पवारांचे निर्देश

Restrictions in Maharashtra | राज्यात निर्बंध वाढणार? अजित पवारांनी सांगितलं…