Pune Crime | पुण्यातील कार शोरुमची 42 लाखाची फसवणूक, सेल्स मॅनेजरवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील दि कोठारी व्हिल्स मारुती शोरूममध्ये (The Kothari Wheels Maruti Showroom Viman Nagar Pune) सेल्स विभागातील (Sales Department) मॅनेजरने (Manager) कंपनीला तब्बल 42 लाख रुपयांचा गंडा (Cheating) घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात (vimantal Police Station) वैभव भरत देसाई (Vaibhav Bharat Desai) याच्याविरुद्ध IPC 420, 406, 468, 469, 471 नुसार गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे.
याबाबत अनिल बाबुलाल गिरी Anil Babulal Giri (वय-49 रा. मोतीबाग, खेसेपार्क, लोहगाव) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार वैभव देसाई (रा. जनकबाबा दर्ग्याजवळ, खराडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 8 फेब्रुवारी 2021 ते 22 मे 2022 दरम्यान विमाननगर चौकातील दि कोठारी व्हील्स मारुती शोरूम मध्ये घडला आहे. (Pune Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वैभव देसाई हा दि कोठारी व्हिल्स मारुती शोरुम येथे सेल्स विभागात मॅनेजर म्हणून कामाला आहे.
आरोपीने इसाफ स्मॉल फायनान्स बँकेमध्ये (Isaf Small Finance Bank) कोठारी व्हिल या नावाने खाते उघडले होते.
ग्राहकांकडून मिळालेले 42 लाख 15 हजार 151 रुपये आरोपीने स्वत:च्या बँक खात्यात जमा केले.
आरोपीने फिर्य़ादी यांच्या कंपनीला स्वत:च्या बँक खात्याचे चेक देऊन ते बाऊन्स (Check bounce) केले.
यानंतर कंपनीच्या नावाने तयार केलेल्या डमी अकाउंटमध्ये (Dummy Account) चेक भरून कंपनीची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास विमानतळ पोलीस करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Fraud of Rs 42 lakh from car showroom in Pune, FIR on sales management
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
SBI Yono द्वारे आता घरबसल्या मिळेल 35 लाखापर्यंत Personal Loan, या ग्राहकांसाठी विशेष सुविधा