Pune Crime | 3 वर्षात पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाने 5 कोटींची फसवणूक; दोन कंपन्यांच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | ३ वर्षांमध्ये पैसे दुप्पट करुन देण्याचे आमिष दाखवून कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून ५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

 

याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी (Bundgardan Police Station) व्हेंचर इंडिया एल एल पी (venture india llp) व फलक्रम फंड ३, चे चेन्नईचे
संचालक अकील ऊर्फ इथन खत्री (रा. चेन्नई) आणि टेकमेड हेल्थ सेंटर कंपनीचे संचालक कृष्णा रामानाथन, डॉ. राजा (रा. चेन्नई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

 

याबाबत अमन नंदलाल गुप्ता (वय ३८, रा. मगरपट्टा, हडपसर) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (गु. र. नं. २४९/२१) फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी यांना फसविण्याचे उद्देशाने ३ वर्षामध्ये पैसे दुप्पट करुन देण्याचे आमिष दाखवून
त्यांच्याकडून ५ कोटी रुपये त्यांचे टेकमेड हेल्थ सेंटर आणि डायग्नॉस्टीक प्रा. लि. या कंपनीच्या बँक खात्यात नोव्हेंबर २०१५ मध्ये ट्रान्सफर करुन घेतले.
त्यानंतर अद्यापपर्यंत हे पैसे तसेच त्यावर अतिरिक्त मिळणारे पैसे फिर्यादी यांना न देता त्यांच्या पैशांचा अपहार करुन फसवणूक
केली सहायक पोलीस निरीक्षक ठाकूर अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Fraud of Rs 5 crore in the lure of doubling money in 3 years; Filed a case against the directors of two companies

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Hoote | रजनीकांतने लाँच केले सोशल मीडिया अ‍ॅप Hoote, जाणून घ्या काय करू शकता तुम्ही?

PMPML | ‘पीएमपीएमएल’च्या 10 हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार ‘गोड’, ‘स्थायी’ची ‘बोनस’ प्रस्तावला मंजुरी; जाणून घ्या

Pune Crime | पुण्यातील बिबवेवाडीमध्ये 14 वर्षाच्या मुलीचा खून झाल्यानंतर कुटुंबियांनी गृहमंत्र्यांकडे केली ‘ही’ मोठी मागणी