Pune Crime | ट्रस्टचे अध्यक्ष व सचिव असल्याचे भासवून 7.76 कोटींची फसवणूक; दोघांविरुद्ध गुन्हा

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Crime | वक्फ बोर्डाचे (waqf board) बनावट ना हरकत प्रमाणपत्र सादर करुन ट्रस्टचे अध्यक्ष व सचिव असल्याचे भासवून शासनाकडून नुकसान भरपाईची पावणे आठ कोटींची रक्कम परस्पर लूटल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बंडगार्डन पोलिसांनी (bund garden police) दोघांविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

इम्तीयाज महंमद हुसेन शेख आणि चाँद रमजान मुलाणी (दोघे रा. रामनगर, येरवडा) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.
याप्रकरणी प्रादेशिक वक्फ अधिकारी खुस्त्रो खान सर्फराज खान (वय 49, रा. कोंढवा) यांनी बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी (Senior Police Inspector Yashwant Gawari) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळशी (Mulshi) तालुक्यातील माण येथे
ताबुत इनाम इंडोमेंट ट्रस्ट या मुस्लीम ट्रस्टचे मालकीची सुमारे 8 हेक्टर जागा आहे.
या ट्रस्टवर 11 सदस्य आहेत.

या जमिनीपैकी 5 हेक्टर 51 आर जमीन शासनाने राजीव गांधी तंत्रज्ञान टप्पा क्रमांक 4 साठी अधिग्रहण केली. त्याचा मोबदला 9 कोटी 64 लाख 42 हजार 500 रुपये मंजूर केला होता.
ही रक्कम ट्रस्टला मिळाली नसल्याने ट्रस्टींनी वक्फ बोर्डाला कळविले.

 

त्यानंतर खान यांनी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे चौकशी केल्यावर इम्तीयाज शेख व चाँद मुलाणी
यांनी आपण ट्रस्टचे अध्यक्ष व सचिव असल्याचे दाखवून तसेच औरंगाबाद येथील राज्य वक्फ
मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचे बनावट नाहरकत पत्र उपजिल्हाधिकार्‍यांना सादर केले.
सरकारी अधिकार्‍यांची दिशाभूल करुन त्यांच्याकडून 7 कोटी 76 लाख 98 हजार 250 रुपयांचा डिमांड ड्राफ्ट मिळविला.

यादरम्यान तो ट्रस्टच्या खात्यावर जमा न करता स्वत:चे बँक खात्यात जमा करुन शासनाची
व वक्फ मंडळाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

इम्तीयाज शेख यांनी ताबुत इनाम इंडोमेंट ट्रस्टकडे विश्वस्त नियुक्तीसाठी अर्ज दाखल केला होता. त्यांच्याशिवाय आणखी 3 अर्ज दुसर्‍या विश्वस्तांनी दाखल केले होते.
त्यावर अद्याप निर्णय झाला नाही.
त्यांची विश्वस्त म्हणून नेमणूक केली नसताना त्यांनी शासनाची दिशाभूल केल्याचे यात म्हटले आहे.

 

Web Title : Pune Crime | Fraud of Rs 7.76 crore pretending to be chairman and secretary of the trust; Crime against both

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Zika Virus | पुण्यात झिका संसर्गाचा धोका; 4 महिने गर्भधारणा टाळण्याचा तज्ज्ञांकडून सल्ला

Maharashtra Sadan Scam | भुजबळांच्या दोषमुक्ततेला ‘लाचलुचपत’चा विरोध, ACB चा न्यायालयात युक्तीवाद

Milind Narvekar | ‘मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर ED आणि CBI लावू’; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या स्वीय सहायकास धमकी