Pune Crime | अतिरिक्त पोलीस महासंचालकाच्या कार्यालयाच्या नावाने महिला कर्मचार्‍यांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | येरवडा कारागृहात (Yerwada Jail) कार्यरत असलेल्या महिला कर्मचार्‍यांना बदली केल्याची भिती दाखवून अतिरिक्त पोलीस महासंचालकाच्या कार्यालयाच्या नावाने फसवणूक (Cheating Case) करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी कारागृहातील महिला कर्मचार्‍यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३८७/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी इंगोळकर असे नाव सांगणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ३ ऑगस्ट रोजी घडला होता. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या कारागृहात कर्मचारी आहेत. त्यांना एक फोन आला मी एडीजी कार्यालयातून क्लार्क इंगोळकर दादा बोलतोय, असे त्याने सांगितले. तुमची बदली करण्यात येत आहे. त्यानंतर तुम्ही ज्या पॉईटला ड्युटीला होता. तेथील ५ ते ६ तक्रारी आल्या असून ड्युटी पॉईटच्या ५ मुलींना सस्पेंड करण्यात येत आहे. तुम्ही माझ्या गुगल पे अकाऊंटवर १० हजार रुपये ट्रान्सफर करा, असे त्याने सांगितले. आपली बदली होईल, या भितीने त्यांनी १० हजार रुपये गुगल पे (Google Pay) वरुन ट्रान्सफर केले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक वांरगुळ तपास करीत आहेत.

 

 

Web Title : – Pune Crime | Fraud of women employees in the name of office of Additional Director General of Police

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा