Pune Crime | स्वस्तात घर देण्याच्या बहाण्याने फसवणूक, बड्या बिल्डरसह 5 जणांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | स्वस्तात घर देण्याचे आमिष दाखवून ग्राहकांकडून पैसे घेतल्यानंतरही त्यांना मुदतीत सदनिका (Flat) दिल्या नाहीत. तसेच ग्राहकांचे पैसेही परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यवसायिक कंपनी (Construction Company) व त्यांच्या भागीदारांवर पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) सासवड पोलीस ठाण्यात (Saswad police station) फसवणुकीचा (Cheating) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात 17 जणांची फसवणूक झाली आहे.

सचिन अशोक अग्रवाल Sachin Ashok Agarwal (रा. शिवाजीनगर), अशोक नारायण भोसले
(Ashok Narayan Bhosale), प्रतिक्षा अशोक भोसले Pratiksha Ashok Bhosale (दोघेही रा. वाकड), प्रमोद नारायण भोसले Pramod Narayan Bhosale (रा. पाटील कॉम्प्लेक्स, औंध रोड, खडकी), नितीन बिपीन शहा Nitin Bipin Shah (रा. शिवाजीनगर) अशी गुन्हा (FIR) दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी शाहरुख ताजुद्दीन अत्तार Shahrukh Tajuddin Attar (वय-28 रा. कोंढवा बुद्रुक) यांनी सासवड पोलीस ठाण्यात (Saswad police station) फिर्याद दिली.
हा प्रकार 13 ऑगस्ट 2015 ते 9 सप्टेंबर 2021 या कालावधीत घडला आहे.

गुन्हा दाखल करण्यात आलेले सचिन अग्रवाल हे ‘मेपल प्रमोटर्स अ‍ॅण्ड बिल्डर्स’चे (Maple Promoters and Builders) मालक आहेत तर भोसले कुटुंबीय जागामालक आहेत.
तक्रारदार 13 ऑगस्ट 2015 रोजी कंपनीच्या शिवाजीनगर (Shivajinagar) येथील कार्यालयात गेले. त्याठिकाणी त्यांना ‘आपले घर कोंढवा एॅनेक्स’ हा बांधकाम प्रकल्प पसंत पडला.
त्यामुळे त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितल्यानुसार 20 हजार रुपये देऊन तिसऱ्या मजल्यावरील 310 क्रमांकाची सदनीकेची नोंदणी केली.

 

यानंतर फिर्यादी यांनी वेळोवेळी 4 लाख 37 हजार रुपये भरले. पुरंदर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात ‘मेपल प्रमोटर्स अ‍ॅण्ड बिल्डर्स’चे मालक सचिन अग्रवाल यांच्यातर्फे नितीन बिपीन शहा यांनी खरेदीखतही करुन दिले.
त्यावेळी करण्यात आलेल्या करारनाम्यानुसार 36 महिन्यात घराचा ताबा देण्याचे ठरले होते.
मात्र, आजपर्यंत संबंधीत इमारतीचे काम पुर्ण झाले नाही, तसेच त्यांना सदनिकेचा ताबा दिला नाही.
तक्रारदार यांनी वेळोवेळी सचिन अग्रवाल, भोसले कुटुंबीय व नितीन शहा यांच्याकडे पाठपुरावा केला.
मात्र त्यांनी सदनिकेचा ताबा दिला नाही. याशिवाय घेतलेले पैसे न देता फसवणूक केली.
पुढील तपास सासवड पोलीस (Saswad Police) करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Fraud under the pretext of giving cheap house, FIR against 5 people including big builder

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

सुखवार्ता ! SBI बँकेनं केली व्याज दरात कपात; आता होम, ऑटो अन् पर्सनल लोनसह इतर कर्जावरील EMI भरावा लागेल कमी

Devendra Fadnavis | ‘कोरोनामध्येही सरकारला सावकारासारखी वसुली करायचीय, म्हणून हे सगळं नाटक सुरू’

Naseeruddin Shah | CM योगी यांच्या ‘अब्बाजान’ वक्तव्यावर संतापले नसीरूद्दीन शाह; म्हणाले…