Pune Crime | मुलाच्या ऑपरेशनचा बहाणा करुन पैसे घेऊन केली फसवणूक; वडिल मुलीवर गुन्हा दाखल, मृत्यु पावलेल्या पतीच्या केल्या खोट्या सह्या

पुणे : Pune Crime | मुलाच्या ह्दयाला होल असून त्याचे तातडीने ऑपरेशन (Operation) करायचे आहे. त्यासाठी पैशांची गरज असल्याचे भावनिक आवाहन करुन ७ लाख रुपये उसने घेतले. ते परत करण्यासाठी महिलेने टाळाटाळ केली. त्यानंतर धनादेशावर (Cheque) मृत्यु पावलेल्या पतीच्या खोट्या सह्या करुन फसवणूक (Fraud Case) केल्याप्रकरणी मुलगी व वडिलांवर पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

आदिती प्रवीण कुलकर्णी Aditi Praveen Kulkarni (वय ४०) आणि विजय धामणकर Vijay Dhamankar (वय ६५, दोघे रा. आनंदनगर, कोथरुड) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी गणेश शिंदे Ganesh Shinde (वय ३१, रा. शिवाजीनगर) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २३०/२२) दिली आहे. हा प्रकार डिसेंबर २०१८ ते ऑगस्ट २०१९ दरम्यान घडला. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा वॉशिंगचा व्यवसाय (Washing Business) आहे.
मित्राच्या कार्यालयात त्यांची अदिती कुलकर्णी यांच्याशी ओळख झाली. तिने माझ्या मुलाचे ह्दयात होल असून त्यासाठी मला ७ लाख रुपयांची गरज असल्याचे सांगून भावनिक आवाहन केले. त्यामुळे फिर्यादी यांनी त्यांना स्वत:जवळचे पैसे व घरातील दागिने गहाण ठेवून व ओळखीतून काही पैसे जमवून अदिती कुलकर्णी यांना ७ लाख रुपये दिले. स्टँपपेपरवर उसनवार पावती लिहून घेतली. कुलकर्णी यांना २ महिन्यांच्या बोलीवर पैसे दिले होते. त्यानंतर अनेकदा पैशांची मागणी करुनही तिने पैसे परत केले नाही.
त्याबाबत फिर्यादी यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार केली.
तेव्हा पोलीस ठाण्यात त्यांच्यात समझोता होऊन २८ फेब्रुवारी २०१९ रोजी त्यांनी १ लाख रुपयांचा चेक दिला.
दुसर्‍या चेकवर तिने व तिचे वडिल विजय धामणकर यांनी अदितीचे मृत्यु पावलेले पती प्रविणी कुलकर्णी
(Pravini Kulkarni) यांच्या खोटया सह्या करुन फिर्यादींना चेक दिला.
त्यामुळे ही रक्कम त्यांना मिळू शकली नाही. फिर्यादी यांनी न्यायालयात धाव घेऊन अर्ज केला.
त्यानुसार न्यायालयाच्या आदेशानुसार कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण (Assistant Police Inspector Chavan) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Fraud with money on the pretext of child’s operation; Case filed against father and daughter, forged signatures of deceased husband

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Home Remedy For Hair Fall | केस गळती थांबेल ताबडतोब, उगवतील नवीन केस, केवळ ‘या’ 3 तेलाने करा मालिश

Kitchen Hacks | कोथिंबीर फ्रिजमध्ये ठेवूनही सुकते का? ‘या’ 4 पद्धतीने फ्रेश राहतील भाज्या