Pune Crime | पुण्यातील कंपनीचे गोपनीय डायग्राम चोरुन फसवणूक, सहा जणांवर कॉपीराईट अंतर्गत FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | भारत सरकारचे (Government of India) पेटंट (Patent) असलेल्या पुण्यातील एका कंपनीचे गोपनीय डायग्राम (Confidential Diagram) चोरुन (Stealing) ते दुसऱ्या कंपनीला देऊन फसवणूक (Cheating Case) केल्याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) सहा जणांवर 420,34, कॉपीराइट एक्ट (Copyright Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. श्रीकांत बालकृष्ण पोतनीस Shrikant Balakrishna Potnis (रा. नाशिक-Nashik), आर रवीकुमार (R Ravi Kumar), राधाकृष्ण प्रकाश (Radhakrishna Prakash), आर बालसुब्रहमण्यम (R Balasubrahmanyam), आयुश राज सोनी (Ayush Raj Soni), सचिन पी वेताळ (Sachin P Vetal) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे (Pune Crime) आहेत.

 

याबाबत विठ्ठल भगवान जाधव Vitthal Bhagwan Jadhav (रा. 60 रा. डी.पी. रोड, साडेसतरा नळी, हडपसर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 2015 ते एप्रिल 2022 या कालावधीत पुणे नगर रोडवरील (Pune Nagar Road) फिनीक्स मॉलच्या (Phoenix Mall) शेजारी असलेल्या सीटीआर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज प्रा. लि. (CTR Manufacturing Industries Pvt. Ltd.) येथे घडला आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीटीआर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज प्रा. लि. या कंपनीने नायट्रोजन इंजेक्शन फायर प्रोटेक्शन अँड एस्टिंग्युशींग सिस्टम (Nitrogen Injection Fire Protection and Extinguishing System) तयार केली आहे. याला भारत सरकारचे पेटंट प्राप्त झाले आहे. आरोपी आयुष राज सोनी आणि सचिन पी वेताळ यांनी 2015 ते 2018 या कालावधीत कंपनीत काम करत असताना या उत्पादनाचे गोपनीय डायग्राम चोरले. हे डायग्रम तामीळनाडू (Tamil Nadu) येथील Easun MR Tap Changer Pvt. Ltd. कंपनीतील श्रीकांत पोतनीस, आर रवीकुमार, राधाकृष्ण प्रकाश आणि आर बालसुब्रहमण्याम यांना दिले.

 

आरोपींनी डायग्रामध्ये थोडेफार बदल करुन फिर्यादी यांची कंपनी उत्पादीत करत असलेल्या उत्पादनाची हुबेहुब उत्पादने तयार केली.
तसेच ही उत्पादने कमी किमतीला टेंडर पद्धतीने विकून ग्राहकांची आणि कंपनीची फसवणूक केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे.
पुढील तपास विमानतळ पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Fraudulent theft of confidential diagram of a company in Pune, FIR against six persons under copyright

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा