Pune Crime | आंदेकर टोळीतील फरार आरोपी आणि पोलिसात नाना पेठेत सिनेस्टाईल थरार, मोक्का गुन्ह्यातील आरोपीच्या आवळल्या मुसक्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीला समर्थ पोलीस ठाण्यातील (Samarth Police Station) तपास पथकाच्या (Investigation Team) पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. तन्मय गणेश कांबळे Tanmay Ganesh Kamble (वय-19 रा. राजेवाडी, नाना पेठ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो पुणे शहरातील (Pune Crime) आंदेकर टोळीचा (Andekar Gang) सदस्य आहे. हडपसर पोलीस ठाण्याच्या (Hadapsar Police Station) हद्दीत दहशत माजवणाऱ्या टोळीवर नुकतीच पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई (MCOCA Action) Mokka केली होती. यामध्ये आरोपी तन्मय कांबळे हा फरार होता. (Pune Crime)

 

दोन महिन्यापूर्वी आरोपी तन्मय कांबळे व त्याच्या साथीदारांनी काळेपडळ, हडपसर परिसरातील एका दाम्पत्याला दमदाटी करुन, आंदेकर टोळीचा धाक दाखवून मला पैसे मागता का, तुम्हाला माहित नाही का, आम्ही ए गँगचे आहोत, आमच्या पुढे आवाज नाही करायचा, नाहीतर खेळ खल्लास अशी दमदाटी करुन गोंधळ घालत परिसरात दहशत पसरवली होती. तसेच डोक्यात कोयत्याने वार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केला होता. या गुन्ह्यातील आरोपींवर मोक्का कारवाई करण्यात आली असून आरोपी तन्मय कांबळे फरार होता.(Pune Crime)

दरम्यान समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे राष्ट्रपतींच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार हेमंत पेरणे (Hemant Perane) यांना माहिती मिळाली की, मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आलेला आरोपी तन्मय कांबळे याचा जामीन (Bail) रद्द झाला असून आरोपी मंगळवार पेठ येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

 

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला असता तो सार्वजनिक रोडच्या कडेला उभा असल्याचे दिसला. पोलीस त्याला पकडण्यासाठी गेले असता आरोपीला पोलिसांची चाहूल लागताच त्याने गर्दीचा फायदा घेत दुचाकीवरुन राँग साईडने पळून जाऊ लागला. तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे (API Sandeep Jore), पोलीस अंमलदार हमेंत पेरणे, शुभम देसाई (Shubham Desai) यांनी त्याचा एक किलोमीटर पर्यंत सिनेस्टाईल पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी आरोपीला हडपसर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale),
पोलीस उप आयुक्त परिमंडळ 1 डॉ . प्रियंका नारनवरे (DCP Dr. Priyanka Narnavare),
सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग सतिश गोवेकर (ACP Satish Govekar),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे (Senior Police Inspector Vishnu Tamhane),
पोलीस निरीक्षक गुन्हे उल्हास कदम (Police Inspector Ulhas Kadam) यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे,
पोलीस हवालदार संतोष काळे, सुशील लोणकर, पोलीस नाईक सुभाष पिंगळे, पोलीस अंमलदार हेमंत पेरणे,
शुभम देसाई, सुभाष मोरे, विठ्ठल चोरमले, महेश जाधव, निलेश साबळे, शाम सुर्यवंशी यांनी केली.

 

Web Title :- Pune Crime | Fugitive accused in Andekar gang and cinestyle tremor in
Nana Peth in police, accused in Mcoca crime

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा