Pune Crime | नगरमध्ये खून करुन झाले होते फरार ! अपहरण करणार्‍या 5 जणांना भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | हॉटेलमध्ये जेवणाचे बील मागितल्याने वेटरला मारहाण करुन त्याचे अपहरण (Kidnapping) केले होते. भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police) जेजुरी (Jejuri) येथून यातील ५ जणांना अटक केली. त्यांच्याकडे तपास केल्यावर ते अहमदनगर येथे एकाचा खून (Murder In Ahmednagar) करुन पळून आले असल्याची माहिती पुढे आली आहे. (Pune Crime)

 

योगेश सर्जेराव पार (वय २८), रवींद्र सखाहरी कानडे (वय ४१), रुपेश अशोक वाडेकर (वय ३८), ओंकार जालिंदर बेंद्रे (वय ३२), नितीन अशोक वाडेकर (वय ३२, सर्व रा. अहमदनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime)

 

याबाबत शारदा निलेश भिलारे (वय ३८, रा. भिल्लारेवाडी, सातारा रोड – Satara Road) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४५६/२२) दिली आहे. हा प्रकार जांभुळवाडी (Jambhulwadi, Pune) येथील नवीन बोगद्याजवळील रानमाळ हॉटेलमध्ये सोमवारी रात्री आठ वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे रानमाळ हॉटेल आहे. आरोपींनी त्यांच्या हॉटेलमध्ये येऊन जेवण केले. त्यांच्या हॉटेलमधील वेटर किशोर कोईराला याने जेवणानंतर त्यांच्याकडे बिलाची मागणी केली. तेव्हा त्यांनी किशोर याला मारहाण करुन जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्याकडील पांढर्‍या रंगाच्या ब्रेझा या कारमधून जबरदस्तीने अपहरण केले. जाताना त्यांना उद्या तुम्हाला त्याची मरणाची खबर येईल, असे सांगून ते निघून गेले. शारदा भिलारे यांनी तातडीने ही बाब भारती विद्यापीठ पोलिसांना कळविली.

 

पोलिसांनी यातील गांभीर्य लक्षात घेऊन लगेच वेगवेगळी पथके तयार करुन त्यांचा शोध सुरु केला.
त्यांचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले.
त्यावर केलेल्या तांत्रिक तपासात हे सर्व जण जेजुरीजवळील एका ठिकाणी पार्टी करीत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलीस पथकाने तेथे जाऊन पाचही जणांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत ते एकाचा खून करुन नगरमधून पळून आल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे.
पोलीस उपनिरीक्षक कर्चे अधिक तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Fugitives were killed in the city Bharti Vidyapeeth police arrest 5 criminals

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा