×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | पिळदार शरिर यष्ठीसाठी इंजेक्शनची बेकायदा विक्री करणारा गजाआड, पावणे...

Pune Crime | पिळदार शरिर यष्ठीसाठी इंजेक्शनची बेकायदा विक्री करणारा गजाआड, पावणे दोन लाखांची इजेक्शन जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | झटपट पिळदार शरीरयष्टी बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनची (Injection) अवैध पद्धतीने विक्री करणाऱ्या एकाला गुन्हे शाखा (Crime Branch) अन्न आणि औषध प्रशासनाने (Food and Drug Administration (FDA) अटक केली आहे. ही कारवाई (Pune Crime) शंकरशेठ रस्त्यावर संयुक्तपणे करण्यात आली. अमृत पंडित चौधरी Amrit Pandit Chaudhary (वय-30 रा. केशवनगर, मुंढवा) असे अटक (Arrest) केलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपी अमृत चौधरी याच्याकडून पावणे दोन लाख रुपये किंमतीची इंजेक्शन जप्त केली आहेत. त्याच्याविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचे निरीक्षक शामल महिंद्रकर (FDA Inspector Shamal Mahindrakar) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

पिळदार शरीरयष्टी बनवण्यासाठी तरुण डॉक्टरांच्या सल्ल्याने या इंजेक्शनचा वापर करतात.
चौधरी हा या इंजेक्शनची बेकायदा विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनला
(Crime Branch Unit Two) मिळाली. त्यानंतर पोलिसांनी शंकरशेठ रोडवर (Shankarsheth Road)
सापळा रचून चौधरीला ताब्यात घेतले.
त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 1 लाख 70 हजार 305 रुपयांची इंजेक्शन आढळून आली.
पोलिसांनी इंजेक्शन जप्त करुन चौधरी विरोधात गुन्हा दाखल करुन अटक केली.

Web Title :- Pune Crime | Gajaad, Pavne 2 lakh injections seized from illegal seller of injections for body fat crime news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | शाळेतील मुलाचा लैंगिक छळ करणाऱ्या माजी मुख्याध्यापकासह दोन धर्मगुरुंवर FIR

Maharashtra Politics | पेंग्विनने खुप प्रसिद्धी दिली…तुम्ही पेंग्विन सेना बोलत रहा, आदित्य ठाकरेंचा शिंदे गट आणि भाजपाला टोला

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News