Pune Crime | आयुर्वेदिक ऑईलच्या व्यवसायाचे आमिष दाखवून सव्वा कोटींना घातला गंडा

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  ऑनलाईन व्यवसायाचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगार अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालत असल्याचे समोर येत आहे. अशीच एक घटना पुण्यात (Pune Crime) घडली आहे. अमेरिकेत (United States) आयुर्वेदिक ऑईलला (Ayurvedic oil) चांगली मागणी असल्याने ऑईल, सिडसच्या व्यवसायातील जादा नफ्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची फसवणूक केली. सायबर गुन्हेगारांनी (Cyber criminals) व्यावसायिकाला तब्बल सव्वा कोटी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) समोर आला आहे.

याप्रकरणी राजू मनसुख रुपारेलिया Raju Mansukh Ruparelia (वय 56, रा. ढोले पाटील रोड, बंडगार्डन) यांनी पुणे सायबर पोलिसांकडे (Pune Cyber Police) फिर्याद दिली आहे.
हा प्रकार डिसेंबर 2018 ते मे 2019 दरम्यान घडला. सायबर चोरट्यांनी ब्रिटनमधील (Britain) फोन नंबरचे एक्सेस वापरुन आपण ब्रिटनमधून बोलत असल्याचे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला होता.
त्यामुळे त्यांना गेली 2 वर्षे ते आपल्याला मोठा परतावा देईल, असे वाटत होते.
सायबर पोलिसांनी मारिया, गिता शर्मा, डॉ. जेम्स विल्यम, मॉरीसन, संगीता शर्मा, पामिला, राईस, ईरटीया यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची एका सोशल मीडियावरील साईटवर (social media site) मारिया हिच्याशी ओळख झाली.
त्यानंतर त्यांनी काही दिवस चॅटिंग केले. त्यानंतर तिने एकत्र बिझनेस करण्याची गळ फिर्यादींना घातली. अमेरिकेत आयुर्वेदिक ऑईल,सिडसला चांगली मागणी आहे.
त्याचा आपण व्यवसाय करु असे तिने सांगितले.

त्यानंतर तिने आपल्या इतर सहकार्‍यांना संपर्क साधायला लावला. त्यांनी ब्रिटन येथून त्यांच्याशी संपर्क साधत असल्याचे भासविले. त्यामुळे फिर्यादींना हा सर्व प्रकार खरा वाटला.
ऑईल व सिडस खरेदी करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे भरण्यास भाग पाडले.
ते जास्त दराने विकत घेण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून एकूण 1 कोटी 24 लाख 28 हजार 608 रुपये भरायला लावले.

इतके पैसे भरल्यानंतर त्यांना कोणताही परतावा न मिळाल्याने त्यांनी पैसे परत मागितले. त्यानंतर मे 2019 मध्ये त्यांनी संपर्क तोडला. त्यानंतर फिर्यादी हे त्यांचा शोध घेत होते.
शेवटी त्यांचा काहीही थांगपत्ता न लागल्यावर शेवटी त्यांनी सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामणी (Police Inspector Ankush Chintamani) अधिक तपास करीत आहेत.

Web Title : pune crime | Ganda spent a quarter of a crore by showing the lure of Ayurvedic oil business

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Railway Station | पुणे रेल्वे स्टेशनचे 97 व्या वर्षात पदार्पण

BJP Maharashtra | झारखंडमध्ये सरकार पाडण्याच्या षडयंत्राचे महाराष्ट्र भाजपशी ‘कनेक्शन’? नेते अडचणीत येण्याची शक्यता

Pollution And Coronavirus | सावधान ! प्रदूषणामुळे सुद्धा पसरतो कोरोना, भयावह आहे रिसर्चमध्ये झालेला खळबळजनक खुलासा